Breaking News

*कटींग ने कोरोना होणार नाही पण दाढीचे काय?* *सलून वेवसायिकांचा सवाल*

*कटींग ने कोरोना होणार नाही पण दाढीचे काय?*

*सलून वेवसायिकांचा सवाल*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : देशात कोरोनाच्या पर्शवभूमीवर मागील तीन महिन्यापासून लॉक डाऊन मुळे शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व सलून दुकाने बंद होती. राज्यातील सलून दुकाने सुरू करण्याची मागणी सलून वेवसायिकांनी शासनाकडे लावून धरली. आणि शेवटी सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी काही शर्थी अटीवर दिली.

त्यामुळे मागील तीन महिन्यापासून उपासमारीच्या सावटाखाली वावरत असलेल्या सलून वेवसायिकांना दिलासा मिळाला. परंतु त्यात एक अट आहे की, या अटी विषयी अनेक सलून वेवसायिकांनी नाराजी वेक्त केली आहे. ती अट म्हणजे सलून मध्ये फक्त कटींग करता येईल, पण दाढी करता येणार नाही. त्यामुळे अनेक दुकान दारांनी फक्त कटींग करून मिळेल दाढी करून मिळणार नाही, अशी पाटीच लावली आहे.

मौदा येथील सलून दुकानदार विश्वास येसकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही आपल्या दुकानात सर्व प्रकारचे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना केली आहे. त्यात सँनिटायझर, मास्क चा वापर करीत आहो. परंतु या नियमामुळे प्रती ग्राहक आमचे २० ते ३० रुपये नुकसान झाले आहे. कारण बरेच ग्राहक कटींग करण्यास आले तर ते दाढी पण करत असतात. त्यामुळे या नियमात बदल करून सरसकट दाढी आणि कटींग करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विश्वास येसकर यांनी केली आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …