Breaking News

*पीक कर्जासाठी पोर्टलची सुरुवात: २९ जूनपासून शेतकऱ्यांना करता येईल अर्ज*

*पीक कर्जासाठी पोर्टलची सुरुवात: २९ जूनपासून शेतकऱ्यांना करता येईल अर्ज*

गडचिरोली प्रतिनिधी -सूरज कुकुडकर

गडचिरोली–  पीक कर्जाची मागणी करताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने www.kccgad.com या नावाने पोर्टल सुरु केले असून, त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते आज झाले. शेतकऱ्यांनी याच पोर्टलवर पीक कर्जाच्या मागणीचे अर्ज करावे, असे आवाहन श्री.सिंगला यांनी यावेळी केले.

व्यावसायिक बँका विनाकारण शेतकऱ्यांचे पीक कर्ज नाकारतात. शिवाय विविध कागदपत्रांची मागणी करुन त्यांना परत पाठवितात. त्यामुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहतात. यावर उपाय म्हणून आता जिल्हाधिकारी कार्यालयाने नवीन पोर्टल तयार कले आहे. www.kccgad.com या नावाने हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. सोमवार २९ जूनपासून शेतकऱ्यांनी या पोर्टलवर अर्ज करणे सुरू करावे. काही अडचण आल्यास कृषी मित्र, आपले सरकार सेवा केंद्र, बँक सखी, कृषी सहायक यापैकी एकाकडून मदत घ्यावी. या प्रक्रियेमुळे बँकांना अकारण पीक कर्ज नाकारता येणार नाही. प्रत्येक पीक कर्ज अर्जावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष असणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी पोर्टलच्या शुभारंभप्रसंगी सांगितले.

राज्यात हा नावीण्यपूर्ण प्रकल्प असून, यातून शेती व्यवसायाला चालना मिळेल. शेतकऱ्यांना वेळेत बी-बियाणे, खते व मजुरीसाठी पैसे हातात मिळतील. तसेच लागवडीचे क्षेत्र वाढण्यासही मदत मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या पोर्टलच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा उपनिबंधक, अग्रणी बँक व्यवस्थापक व सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

*बँकांचे पीक कर्ज उद्दिष्ट वाढविले*
जिल्हयात दरवर्षी पीक कर्जाचे अंदाजे १५९ कोटी रूपयांचे उद्दिष्ट असायचे. यंदा त्यात वाढ करुन ते ३९० कोटी रूपये करण्यात आले आहे. सर्व बॅकांना १५ जुलैपर्यंत ५० टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ ३६ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. यात व्यावसायिक बँकांचा सहभाग १५ टक्के, तर सहकारी बँकेचा सहभाग ६६ टक्के आहे. यापुढे दर शुक्रवारी सर्व बँकांचा पीक कर्जाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नाही तर संबंधित बँकेवर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात येणार आहेत.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …