*बनावट खते बियाने विकणाऱ्या दुकांदारावर कार्यवाही करा*
*युवा सेनेचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
*खापरखेडा*:- राज्यात सर्वत्र पेरणीला सुरुवात झाली आहे त्यासाठी मुबलक बियाने, खते, औषधी अपेक्षित आहेत मात्र कोरोना मूळे आधीच हवालदिल झालेल्या बळीराज्याला बनावट विक्री केल्या जात आहे त्यामुळे राज्यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे निदान हा प्रकार सावनेर तालुक्यात थांबविण्यात यावा या मागणी साठी युवासेनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना युवासेना नागपूर जिल्हा समन्वयक राज तांडेकर यांच्या नेतृत्वात नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
सावनेर तालुक्यात पेरणीला सुरूवात झाली आहे बाजारपेठेत बियाणे व खत विक्री सुरू आहे मात्र मागील काही दिवसापूर्वी चाळीस गाव व सोलापूर जिल्ह्यात बनावट खते विकणाऱ्या दुकांनदारांचा भांडाफोड झाला यासंदर्भात अधिक चौकाशी केली असता बनावट खतांची विक्री राज्यात सुरू असल्याचे प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा निदर्शनात आले आहे सदर बाब चिंताजनक असून शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सावनेर तालुक्यात खते बियाने दुकानदाराच्या दुकानाची रितसर तपासणी करण्यात यावी करावी बनावाट विक्री करणाऱ्या दुकानदावर कायदेशीर कार्यवाही करावी या आशयाचे निवेदन तालुका कृषी अधिकारी आश्विनी कोरे यांना देण्यात आले यावेळी युवासेना नागपूर जिल्हा समन्वयक राज तांडेकर यांच्यासह शिवसेना तालुका प्रमुख नरेंद्र मोरे, शहर प्रमुख सुभाष मचले, सचिन गजभिये, कृष्णा बर्वे, धीरज गुप्ता योगेश जालंदर, चेतन भोंडेकर, मनीष कुंभलकर, शैलेश कानोजिया आदि युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज