Breaking News

*मनसेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन* *कंपनी संचालकांनी परप्रांतीय मजुरांच्या नोंदी ठेवणे व स्थानिकांना प्राथमिकता द्या निवेदनाव्दारे मागणी*

*मनसेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन*


*कंपनी संचालकांनी परप्रांतीय मजुरांच्या नोंदी ठेवणे व स्थानिकांना प्राथमिकता द्या निवेदनाव्दारे मागणी*

वरोरा प्रतिनिधी जुबेर शेख सोबत मुजम्मील शेख

*वरोरा-  तालुक्यातील नंदोरी टोल नाक्याजवळ अग्रवाल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कार्यरत आहे,बरेच दिवसापासून त्या कम्पणीचे काम सुरू आहे व त्या कामाकरिता कंपनीला जो मजूर वर्ग लागत आहे तो मजूर वर्ग ती कंपनी बाहेर राज्यातून आणत आहे ,सध्याच्या परिस्थितीत देशात कोरोनाचे संकट सर्वत्र पसरलेले असतांना बाहेर राज्यातून मजूर आणून त्यांच्या कडून काम घेणे धोकादायक ठरू शकते व त्यातही तिथे आलेल्या मजुरांची कुठेही नोंद नाही किती असले किती नाही याची सविस्तर माहिती घ्यावी व कंपनीने माहिती न दिल्यास त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदनातून सादर करण्यात आले आहे*

*महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार कोणत्याही कंपनीत स्थानिक कामगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावेत याही करीता निवेदन सादर करण्यात आले यावर उपविभागीय अधिकारी साहेब यांनी व वरोरा पोलीस निरीक्षक साहेब यांनी येत्या 8 दिवसात यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले आहे हे निवेदन मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत जुंजारे,तालुका अध्यक्ष गौरव मेले, शहर अध्यक्ष आकाश ठावरी,तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, सतीश लांबट ,दीपक देशमुख ,निखिल ताजने, आशुतोष घाटे, शामभाऊ मडावी ,निखिल ढवस आदी मनसैनिक उपस्थित होते*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …