*वाढीव इलेक्ट्रिक बिला विरुद्ध जानाक्रोश*
*अधिक्षक अभियंता यांना निवेदन*
नागपूर प्रतिनिधी ज्योत्सना इंगळे
*नागपूरः भारतीय जनता पार्टी दक्षिण नागपूर तर्फे महाराष्ट्र शासनाने पाठविलेल्या वाढीव विद्युत बिला विरुद्ध निदर्शन व जनआंदोलन करून एम.एस.ईबी. कार्यालय तुकडोजी पुतळा चौक येथील समीर टेकाडे अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले यावेळी दक्षिण नागपूरचे अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे, माजी अध्यक्ष संजू भाऊ ठाकरे, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन भाऊ मते, प्रभाग 34 चे नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, मंगला खेकरे, प्रवीण ठाकरे तसेच भाजप पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या लॉकडाऊन मधे सर्वांचे काम बंद होते आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने तीन महिन्याचे एकत्रित बिल देऊन आम जनतेच्या डोक्यावरील बिलाचा बोझा वाढविला साधारण व्यक्तीला वीस ते तीस हजार असे बिल पाठविण्यात आले, अशा वेळेस त्या कुटुंबाने स्वतःचे पोट भरावे की विजेचे बिल भरावे असा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे, काही लोकांना नियमित बिल भरून सुद्धा तीन महिन्याचे बिल लागून आले आहेत म्हणून जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच आज जनतेने रस्त्यावर उतरून या महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन केले.
Maharashtra News Media सच की आवाज