*आपसी वादात एकाची हत्या*
*सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत “पारधी बेडा” मांडवी येथील घटना*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेर ता. 29: घरासामोर असलेल्या रस्त्यावर कुंपण कां घातले या कारणावरून मु्तक व आरोपीत होत असलेल्या तोंडीं वादाचे रुपांतर जीवघेण्या हल्यात होत दोन्ही आरोपींनी काठी व भाल्याच्या पात्याने एकाची हत्या केली.*
*सदर घटना सावनेर पो.स्टे. अंतर्गत मांडवी,पारधी बेडा येथे दि. 28 रोजी 5ः30 च्या सुमारास घडली. शेटकुमार रमेश राजपूत असे मृतकाचे नांव आहे.*
*मिळालेल्या माहितीनुसार सावनेर पो.स्टे. अंतर्गत येणा-या मांडवी पारधी बेडा येथे आरोपी मंजुकुमार चैव्हाण व सावनकुमार राजपूत दोघेही रा. मांडवी पारधी बेडा, यांनी मृतक शेटकुमार राजपूत याच्याशी त्यांच्या घरासामोरील रस्त्यावर कुंपण कां घातले या शुल्लक कारणावरून दि. 28 रोजी सायं. 5ः30 च्या सुमारास वाद घालून शेटकुमार राजपूत यांस लाठी काठीने मारून व लोखंडी भाल्याच्या पात्याने निर्दयीपणे वार करुण त्यास ठार केले*
*राहुल रमेश राजपूत रा. मसखापरा (25) पो. ईसापूर ता. काटोल यांच्या फिर्यादीवरून सावनेर पोलिसांनी अपराध क्र. 237/20 भा.दं.वि.302,34 नुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय सागर कारंडे,एपीआय निशांत फुलेकर,हेका सुधिर यादगीरे, व सहकारी करीत आहे.*
*सावनेर पो.स्टे.अंतर्गत येणारे पारधी बेडा मांडवी हे स्थान अवैध मोहफुल दारु,मोबाईल चोरी,चोरीचे मोबाईल विक्री करिता प्रख्यात असुन आपसी झगडे भांडन ही नेहमीचीच बाब असल्याचे सुत्र असुन सदर परिसरात वरच्या वर पोलीस कारवाया होऊण गुन्हेगारी प्रवु्त्तीवर आळा बसवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे*