Breaking News

*वाढदिवसाचे आगळेवेगळे आयोजन* *शेतात होम हवन व वु्क्षारोपन करुण केला वाढदिवस साजरा*

*वाढदिवसाचे आगळेवेगळे आयोजन*

*शेतात होम हवन व वु्क्षारोपन करुण केला वाढदिवस साजरा*

नागपुर प्रतिनिधी ज्योत्सना इंगळे

*नागपूरपतंजलि योग पीठ हरिव्दार च्या मार्गदर्शनाखाली सेवाकार्य करणारे भारत स्वाभिमान चे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र पुर्वचे मार्गदर्शक प्रदिपजी काटेकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमीत्याने जिल्ह्यातील कुही तालुक्यातील तितुर येथील त्यांच्या शेतात होमहवन केले तसेच शेताच्या बांध्यावर औषधि गुणांनी परिपूर्ण अश्वगंधा या वनस्पतीचे रोपटे लावुन वृक्षारोपन करुण आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी त्यांच्या धर्मपत्नी सौ.रेखाताई काटेकर सोबतच योगप्रचारिका माधुरिताई ठाकरे, रामभाऊजी वर्हाडे,सौ.शारदाताई वर्हाडे आदिंनी उपस्थित राहुन दिर्घायष्याच्या शुभेच्छा दिल्या.*


*शिक्षण क्षेत्रात आपले संपूर्ण जिवन वेचून सामाजिक कार्याची ओढ असणारे प्रदिपजी काटेकर यांनी कोरोना काळात कुठेही गर्दी करता येत नसल्याने व शुभेच्छा देणार्या आप्त परिवाराची गर्दी होऊ नये याकरिता शेतामध्ये साध्या पध्दतीने आपला वाढदिवस साजरा करुण एक आदर्श निर्माण करत आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला.*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …