*ऑनलाइन आसन प्रतियोगिते मध्ये नागपूरच्या स्मिता कोचे अव्वल*

*सातशे स्पर्धकात प्रथम स्थान मिळवत नागपूर चे नाव केले लौकीक*
नागपूर प्रतिनिधी सौ ज्योत्स्ना इंगळे सोबत सुरेखा नवघरे
नागपुर- महिला पतंजली योग समिती नागपूर जिल्हा च्या योग साधिकांनी नुकत्याच पार पडलेल्या “महाराष्ट्र पूर्व ऑनलाइन आसन प्रतियोगिता” यात भाग घेऊन नागपूर च्या मुख्य योग शिक्षिका स्मिता कोचे हिने “सर्वांगासान” मध्ये प्रथम क्रमांक तर वृक्षासनमध्ये चौथा क्रमांक पटकविला तर नागपूरची दुसरी स्पर्धक माधुरी ठाकरे हिने “वृक्षासन” या स्पर्धेत कन्सोलेशन बक्षीस तर नागपुरच्याच हर्षली मोरे कन्सोलेशन बक्षीस घेऊन या आसन प्रतियोगितेमध्ये नागपूर जिल्ह्याला गौरवशाली केले.*
*पतंजलि योग समितीच्या तिघींही महिलांनी नेत्रदीपक असे यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे*
*या आँनलाइन आसन प्रतियोगीतेत नागपुरच्या एकुण 102 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यातील वरील तिघांनी विजय मिळविला.*
*संपूर्ण महाराष्ट्र पुर्व मधे नागपूर शहराचे नाव लौकीक केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्रभारी शोभाताई भागिया,भारत स्वाभिमान चे जिल्हा अध्यक्ष प्रदीपजी काटेकर, कोषाध्यक्ष दीपकजी येवले, जिल्हा प्रभारी छाजूरामजी शर्मा, युवा प्रभारी पंकजजी बांते, जिल्हा प्रभारी उर्मिलाताई जुवारकर, महामंत्री रितू जरगर, मिडिया प्रभारी जोत्सना इंगळे, दक्षिण विभाग प्रमुख कविता गाढवे, योगशिक्षिका सुरेखा नवघरे, शारदा वऱ्हाडे, योगिता कांबळे, शोभा बिहारे, कोषाध्यक्ष विजया लांडे, कार्यालय प्रभारि भावना चौधरि,पश्चिम विभाग प्रमुख माया हाडे, पूर्व विभाग प्रमुख ललिता बडवाईक, माधूरी निंबुरकर, सावनेरच्या महिला प्रमुख लता ढवळे, उमरेडच्या प्रमुख संगिता मिश्रा,लक्ष्मीताई टिकले,मौद्या प्रमुख मोनिका ठाकरे, नागपुर ग्रामीण बोखारा प्रमुख चारु पाटील या सर्व पदाधिकारी महिलांकडुन या नागपुरच्या विजयी तिनही महिला स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.*
*महिला आपले कुटुंब सांभाळून इतरही कामे करून या तिघींनी आसन प्रतियोगीतेमध्ये भाग घेवून सुयश प्राप्त करून दाखविले, की महिला कोणत्यही क्षेत्रात मागे नाही आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये महिलांनी आपले नाव गौरन्वित केले आहे.महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही हे परत स्मिता, माधूरी आणि हर्षाली यांनी सिध्द करून दाखविले.*
*महिला या घर परिवाराचे आधारस्तंभ असुनही या तिघिंनी आपली संपुर्ण कौंटुबीक जबाबदारी पार पाडुन आपले आणि आपल्या परिवाराचे व संघटनेचे नाव उंचावले आहे*
*प्राविण्य प्राप्त स्मिताताईंचा संक्षिप्त परिचय*
*स्मिताताई यांचा सासु-सासरे,मुलगा सुन,मुलगी ,पति असा आप्त परिवार असुन नागपूर शहरात योगचा प्रचार करुण लोकांना आरोग्य देऊण निरोगी करण्याचा छंद असुन एक आदर्श आई व सासुची भुमिका बजावत संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळून सामाजिक कार्यात स्वताला वाहून घेणारे व्यक्तिमत्त्व आहे.तर हर्षाली ही एका कंपनीमध्ये कार्यरत आहे.तर माधुरी ही गु्हणी असुन आपले कर्तव्यपालन करून या स्पर्धेत आपला सहभाग घेत त्या विजयी ठरल्या. एक ना अनेक भुमिका पार पाडत या तिनही महिलांनी यश मिळवित नागपूर शहराची आन-बान आणि शान यांनी कायम ठेवली .अशीच पुढे ही त्यांची प्रगती होत राहो अशा सर्वांनी शुभेच्छा देत त्यांचे उत्साहवर्धन केले*
Maharashtra News Media सच की आवाज