Breaking News

*कोरोना बाधित महिला, तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल* *दोघांवरही ठोठावला प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड*

*कोरोना बाधित महिला, तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल*

*दोघांवरही ठोठावला प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड*

प्रतिनिधि-विश्वास बांगरे

वर्धाप्रशासनाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या कोरोना बाधित महिला व तिच्या पतीविरुद्ध येथील नायब तहसीलदार विनायक मगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला तर भरारी पथक प्रमुखाने दोघांवरही दहा दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला सोमवारी ही कारवाई करण्यात आली अमरावती येथे राहणाऱ्या मेहुण्याच्या लग्नाकरिता येथील नगरसेवक व त्याची पत्नी रविवारी अमरावतीला गेले होते तेथून बुलढाणा येथे जाऊन लग्न समारंभ आटोपून बुधवारी ते परत आले यानंतर प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांना चौदादिवस गृह विलगीकरनात राहण्याची आवश्यकता होती मात्र दोघांनीही याचे पालन केले नाही कोरणाबाधित महिलेने येथील बुलढाणा बँकेत रोखपाल पदाचे काम केले तर तिच्या पतीने नागरिकांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले गुरुवारी रोखपाल महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला व सगळीकडे खळबळ माजली जाजुवाडी परिसर सील करण्यात आला तर शहरातसुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले कोरोनाबाधित महिला व तिच्या पतीने प्रशासनाच्या आदेशाचे व सूचनेचे पालन केले नाही म्हणून येथील नायब तहसीलदार विनायक मगर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली तर निगरानी पथकाचे प्रमुख साकेत राऊत यांनी प्रत्येकी दहा दहा हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …