Breaking News

*पोलिओने ग्रसीत अपंग मुलीवर बलत्कार* *चिंचोली येथील घटना*

*पोलिओने ग्रसीत अपंग मुलीवर बलत्कार*


*चिंचोली येथील घटना*

खापरखेडा/सावनेर विशेष प्रतिनिधि

सावनेरतालुक्यातील मौजा चिंचोली(खापरखेडा) गावातील चौरामडी झोपडपट्टी परिसरात एका २० वर्षीय पोलिओ ग्रसीत अपंग तरुणीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला साकोली येथून आज मंगळवारी तातडीने अटक केली. 


पोलीस सूत्रांनुसार, झाकिर हुसैन दुधकनोजे -६० रा.वार्ड क्र.1 चिंचोली असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने सदर तरुणीच्या अगतिकतेचा फायदा घेऊन रविवारी रात्रीच्या वेळी तिच्या घरी जाऊन अत्याचार केला. याच सुमारास तिचाभाऊ घरी पोहचला असता आरोपी निर्वस्त्र दिसला. त्यांना पाहून काही वेळातच पळ काढला.आरोपी व अपंग तरुणी शेजारीच राहतात. घटनेच्यावेळी त्या अपंग मुलींचे वडील लकवाग्रस्त असल्याने घरीच एका खोलीत झोपून होते.शिवाय घराबाहेर समोर शेजारी काही तरुण खेळण्यात व्यस्त होते.सदर घटनेची तिच्या भावाने खापरखेडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद करुन आरोपींचा शोध सुरू केला.साकोली येथून त्याला आज सकाळी अटक करण्यात आली. याप्रकरणी ठाणेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय धुमाळ मॅडम यांनी तपास सुरू केला. मंगळवारी आरोपीस सावनेर कोर्टात हजर केले असता न्यायाधीशांनी आरोपीचा तीन दिवसांचा पोलीस कोठडी मान्य केला

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …