*कोविड 19 च्या काळातील तीन महिण्याचे लाईट बिल व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ कराव माजी आमदार अँड संजय धोटे यांची मागणी* *भारतीय जनता पार्टी तालुका गोंडपीपरीच्या वतीने तहसील कार्यालय गोंडपीपरी समोर आमरण उपोषण*

*कोविड 19 च्या काळातील तीन महिण्याचे लाईट बिल व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ कराव माजी आमदार अँड संजय धोटे यांची मागणी*

*भारतीय जनता पार्टी तालुका गोंडपीपरीच्या वतीने तहसील कार्यालय गोंडपीपरी समोर आमरण उपोषण*

कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे

कोरपना : – चंद्रपूर राज्‍यातील विज ग्राहकांचे एप्रिल, मे, जून 2020 या तीन महिन्‍यांचे विज बिल माफ करण्‍याची मागणी भाजपा गोंडपीपरी तालुका तर्फे राज्‍य शासनाला करण्‍यात आली.भारतीय जनता पार्टी तालुका गोंडपीपरीच्या वतीने तहसील कार्यालय गोंडपीपरी समोर आमरण उपोषण करण्यात आले होते,यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यावेळी उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते,मध्यप्रदेश सरकारने कोरोना काळातील तीन महिन्याचे बिल माफ केले आहे, त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा माफ करावे अशी यावेळी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शेतकऱ्यांची कर्ज माफी सरसकट करावी,शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे,त्यांना कर्ज माफी करून दिलासा देण्यात यावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली,

कोरोना विषाणूच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्‍या लॉकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद झाले आहे,अनेक कामगारांवर त्‍यामुळे उपासमारीची पाळी आली आहे. अनेक लहान मोठे व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे व्‍यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहे, शेतकरीवर्ग आर्थिक अडचणीत आहे. नवा हंगाम सुरू झाल्‍यामुळे बि-बियाणे, खते खरेदीसाठी हाती पैसा नाही. सर्वच घटक आर्थिक अडचणीत आहेत. यामुळे राज्‍य सरकारने एप्रिल, मे, जुन 2020 या तीन महिन्‍यांचे विज बिल माफ करून राज्‍यातील जनतेला दिलासा द्यावा,अशी मागणी भाजपा गोंडपीपरी तालुका तर्फे करण्‍यात आली आहे.

यावेळी आमरण उपोषणा प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष बबन निकोडे,भाजपा तालुका महामंत्री रवि पावडे,अश्विन कुसनाके,भाजपा नेते अमर बोडलावार,उपसभापती अरुण कोडापे,जिल्हा परिषद सदस्य सौ वैष्णवी बोडलावार, जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती वडपलीवार, माजी सभापती दिपक सातपुते,माजी उपसभापती मनिष वासमवार,साईनाथ मास्टे, भाजपा नेते निलेश संगमवार, भाजपा नेते प्रकाश उत्तरवार, नगरसेवक राकेश पुन,गणपत चौधरी, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, गणेश डहाळे, प्रशांत येल्लेवार,सुनिल फुकट,रामदास शेंडे, विजय शेपूरवार,सौ माया वाघाडे,सौ पुष्पाताई क्षीरसागर,आनंदराव धुमने, अशोक चुधरी,संदीप पोरघर,प्रणय कोहपरे,अतुल पोरघर,मारोती झाडे,जेटलाल राठोड,मारोती शेंडे,रवींद्र आमने,विठ्ठल ढेगरे आदी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपन सुरक्षित रहा.
शेजाऱ्यांना सुरक्षित ठेवा .कोविड १९ ला दुर्मिळ करा …

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …