*दोन टक्याची सूट देण्याच्या -नावावर गोर,गरीब,सामान्यांची थट्टा नको, चार महिन्याची सरसकट विज बिल माफी जाहीर करा*
*युवा स्वाभिमान द्वारा अवास्तव जास्तीचे आलेल्या विज बिलाची होळी*
प्रतिनिधि- विश्वास बांगरे
वर्धा– अन्यथा-जनआंदोलन-उभारू युवा स्वाभिमान पार्टी चा इशारा
आज दिनांक 02/07/2020 रोज गुरुवार ला युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप शा. पोटफोडे यांच्या नेतृत्वात, उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत, पालकमंत्री सुनील केदार वर्धा यांना निवेदन पाठविण्यात आले यावेळी दिनांक 29/06/2020 रोजी विज बिल माफी कृती समिती द्वारा दिलेल्या निवेदनाचे स्मरण करून देण्यात आले विज बिल माफी कृती समिती प्रत्यक्षात आणण्यासाठी सुद्धा युवा स्वाभिमान चे दिलीप पोटफोडे व प्रकल्प ग्रस्त संघर्ष समिती चे राजेश शिरघरे यांचे मोठे योगदान आणि प्रयत्नाने सर्व राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटना, व सामाजिक संस्था एकत्र आल्या व या संकट काळातील आकांत परिस्थिती ला पाहता सरकार ला 4 महिन्याच्या विज बिल माफी साठी आग्रही मागणी केली व सर्व स्तरावर प्रयत्न सुद्धा करत आहेत, परंतु अजून पर्यंत सरकार राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि आकंठ भयावह परिस्थिती बद्दल संवेदनशील दिसत नाही आणि त्यात ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत द्वारा पूर्ण विज बिल भरल्यास 2% टक्के सूट देणार वक्तव्य म्हणजे जखमेवर चोडलेलं मीठ आणि गोर गरीब सामान्यांची केलेली थट्टा च म्हणावी लागेल कोरोना च्या संकटात जनता मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला समर्पित रित्या प्रतिसाद देत, त्रास, हालअपेष्टा,सहन केल्या पण सरकार सोबत जनता खंबीर उभी होती परंतु आज जनतेला सरकारच्या मदतीची नितांत गरज असताना सरकार मात्र पड काढताना दिसते आहे अशी भूमिका निवेदनात स्पष्ट केली आहे करिता येणाऱ्या काळात सरकार द्वारा तात्काळ 4 महिन्याच्या सरसकट विज बिल माफी बाबत धोरणात्मक निर्णय घेऊन तशी अंलबजावणीचे आदेश देत घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली आहे .
तसेच धोरणात्मक निर्णय होई पर्यंत कोणत्याही गोर, गरीब सामान्य विज ग्राहकाची विज खण्डित करू नये अन्यथा विज कम्पनी व सरकार ला आक्रोशाला सामोरे जावे लागेल अस सूचक वाक्य निवेदनात नमूद करण्यात आल आहे तसेच 4 महिन्याची विज बिल माफी तातडीने जाहीर करावी अन्यथा युवा स्वाभिमान पार्टी द्वारे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा निवेदना द्वारा दिला आहे निवेदन देताना : दिलीप पोटफोडे, सुरेंद्र वाटकर, जयंत गभणे, कमलेश, चिंधेकर, सिद्धांत कळंबे, प्रवीण गेडाम, सूरज मेश्राम, दिनेश चातर्कर, शन्करराव हत्तीमारे, शरद सहारे, श्रीकृष्ण कैकाडे, चंद्रकांत पाटणे, योगेश बरवटकर,रोशन राऊत, नितीन मनवर, शेख मजीद शेख रहमान, मोबीन शाह, बाल्या राऊत, बंडू पाटणे व स्वाभिमानी सैनिक उपस्थित होते
Maharashtra News Media सच की आवाज