*तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या*

*तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या*

 

रामटेक तालूका प्रतिनिधी ललित कनोजे 

रामटेकपोलीस स्टेशन हद्दीतील पंचाळा येथिल 17 वर्षिय अल्पवयीन मुलीने घरी गळफास लावुन अात्महत्या केल्याची घटना घडली.
इंदिरा गांधी ज्युनिअर काॅलेज बोरी येथे अकरावीत शिकत असलेली सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अाई-वडील नसल्यामुळे ती मागील दोन वर्षांपासुन पंचाळा येथिल अापले मामा रुपेश नागफासे यांच्या कडे राहत होती. अाज दिनांक 3जुलै 2020 ला मामा कडील सर्व लोक शेता मध्ये कामाला गेली असतांनी ती मुलगी घरी एकटीच होती .
दुपारी दोन वाजता च्या सुमारास तीने गळफास लावुन अात्महत्या केली. सदर घरामध्ये लहान मुलगी अावाज देत घरात गेली असता तीला ही मुलगी घरातील छताला लटकलेल्या अवस्थेत दिसताच त्या मुलीने अाजुबाजुला माहीती दिली.सदर माहीती तिच्या मामा ला कळविली. व घटनेची माहीती पोलीस पाटिल यांनी पोलीस स्टेशन ला दिली.माहीती मीळताच रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात अाले . सदर गुन्हाची मामाच्या माहीती वरुन अाकस्मिक मृत्युची नोंद सीआरपीसीचे कलम 174 अन्वये करण्यात अाली असून पुढील तपास रामटेक पोलीस करीत अाहेत.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …