*चोरीसाठी गाठले एकट्या महीलेचे घर*
*रहात्याच घरी लंकाबाईचा घातपात*
*गडचांदूरात मोठी भिती एकच खळबळ उडाली*

कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे
कोरपना : कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील महात्मा गांधी शाळेच्या मागील भागात वास्तव्यास असणारी लंकाबाई नीलकंठ मेश्राम (वय 60) या महिलेचा त्यांच्या राहत्या घरी मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली असून, सदर महिला येथील वॉर्ड क्रमांक 4, महात्मा गांधी शाळेच्या मागे जिल्हा परिषद शाळेजवळ गेल्या कित्येक दिवसांपासून एकटीच राहत होती. त्यांचे पती नीलकंठ मारोती मेश्राम (वय 72) वेगळे राहत होता.
महिलेच्या घराचा दरवाजा बाहेरून बंद होता आणि सदर महिला दोन-तीन दिवसांपासून कुणालाही दिसली नव्हती. घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांना प्रकरण संशयास्पद वाटू लागले. घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून महिलेच्या पतीला बोलावले आणि घराचे दार उघडले तर समोर महिलेचा मृतदेह पडलेला दिसला. महिलेच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडून होते. पलंगावर रक्त सांडले होते.
घटनास्थळावरील एकंदरीत दृश्य पाहता महिलेची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मृतदेह गडचांदूर ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर महिलेच्या डोक्यावर जखमा असल्याचे सांगण्यात आले. प्रकरण गंभीर असल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी तीन विशेष पथक तैनात करण्यात आले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे गडचांदूर वॉर्ड क्रमांक चार येथील अब्दुल खलील अब्दुल रशीद शेख (वय 22) याला 2 जुलैच्या रात्री संशयित म्हणून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मृत महिलेच्या घरी चोरी करण्याचा उद्देशाने जाऊन महिलेच्या डोक्यावर दगडी पाटा, वीट, भांड्याने मारून ठार केल्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक, गडचांदूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल भारती, प्रमोद शिंदे, चौधरी, शुभांगी ढगे, धर्मराज मुंडे, जगदीश झाडे, रोहित चिलगिरे करीत आहेत. अवघ्या 24 तासांच्या आत खुनाच्या आरोपीला अटक
गडचांदूर पोलिसांनी आहे. अधिक तपास सुरू आहे .
Maharashtra News Media सच की आवाज