Breaking News

*येलदडमीच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार*

*येलदडमीच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार*

गडचिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर

गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया पोलिस मदत केंद्रांतर्गत येलदडमी जंगलात आज संध्याकाळी पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एक नक्षलवादी ठार झाला.

येलदडमी जंगलात पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. अर्धा तास ही चकमक चालली. मात्र, पोलिसांचा दबाव पाहून नक्षलवादी पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्यात एका नक्षल्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरुन नक्षल्यांची एक बंदूक, २० पिट्टू तसेच अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे. नक्षल्यांचे त्या परिसरात शिबिर सुरु असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मृत नक्षल्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …