Breaking News

*दोन दुर्दैवी घटनेत चौघांचा मृत्यू* *नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू* *एक घटनेत दोन महिला तर दुसऱ्या घटनेत 12 वर्षाच्या नातवासह आजोबाचा मृत्यू*

*दोन दुर्दैवी घटनेत चौघांचा मृत्यू*

*नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू*

*एक घटनेत दोन महिला तर दुसऱ्या घटनेत 12 वर्षाच्या नातवासह आजोबाचा मृत्यू*

प्रतिनिधी- विश्वास बांगरे

वर्धाजिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात काल पावसाने दमदार हजेरी लावली यात सर्वत्र नाल्याना पूर आला असून या पुरामध्ये दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे.

पहिल्या घटनेत सोनेगाव स्टेशन येथील दोन महिला काल सायंकाळी शेतातील कामे आटोपून बैल बंडीवर
परत घरी जात असताना नाल्यात अचानक बैल बंडी फसली यात बैलबंडिवरील दोन महिला नाल्यात पडल्या व नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्या यात दोघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सोनेगाव स्टेशन येथील चंद्रकला लोटे आणि तळेगाव टालाटूले येथील बेबी भोयर अशी मृतकाचे नावे असून रात्री उशिरा दोघींचे मृतदेह आढळले आहे. तर दुसऱ्या घटनेत
धोत्रा येथून सावली सांस्ताबाद येथे शेतीच्या कामासाठी भाड्याने आणलेली बैलबंडी नेऊन देताना
सोनेगाव येसंबा येथून येणाऱ्या नाल्यात बैलबंडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. याच बैलबंडीवर असलेले आजे नातू देखील बैलबंडी सह वाहून गेल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी बैलबंडी सह नातवाचा मृत्यू देह आढळल्याने खळबळ उडाली यात काही वेळातच मृतक नातवाच्या आज याचादेखील मृतदेह मिळाला. नारायण चंपत पोहाणे वय 55,मंगेश रामचंद्र हीवरे वय 12 अशे मृतकाचे नावे असून मृतक नातू मंगेश हिवरे याच्या आई वडिलाचे निधन झाले असल्याने तो त्याचे आजोबा मृतक नारायण पोहाने यांच्या कडे धोत्रा या गावी राहत होता.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …