*सुरेखाताई नवघरे यांचा सन्मान*

*कोरोना विषाणूंच्या संसर्गात दिलेल्या सेवेची पावती*
*प्रतिनिधी दिनेश चौरसिया*
*नागपूरः कोवीड़ 19 या कोरोना विषाणूंचे नुसते नाव घेताच जनसामान्यास एकच धडकी भरूण या संसर्गजन्य आजाराबद्दल अनेक वीचार मनात उभे होऊण मनुष्य चितातूर होत असल्याचे आपण बघतच आहोत परंतू अश्यातही आपल्या स्वतःच्या जीवा सोबतच परीवाराची काळजी घेऊण आपले कर्तव्यपालन करणारे डाँक्टर्स, पोलीस कर्मी स्थानिक प्रशासनाच्या खांध्याला खांदा भीडवून कार्य करणारे समाजसेवी यांचा वसुंधरा सोशल फाउंडेशन नागपूर च्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन नुकतेच संन्मानित करण्यात आले*
*नागपूर शहरातील समाजसेवी योग शिक्षीका सुरेखाताई नवघरे यांनी मागील चार महिण्यापासून कोवीड़ 19 च्या रोखण्यासाठी शासनाने केलेल्या लाँकडाऊन मधे कोरोना विषाणूंच्या बद्दल जनजागृती तसेच शासकीय उपाययोजना बद्दल जनजागृती तसेच कोरोना विषाणू पासून आपल्या शरिराचे संरक्षण होण्याकरिता स्वताच्या शरिराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोण कोणते योग प्राणायाम व आसन करुण शरीरयष्टी निरोगी ठेवण्याची माहीती देण्याकरिता स्वताला वाहून घेतल्याबद्दल वसुंधरा सोशल फाऊंडेशन नागपूर चे अध्यक्ष समीर काळे व पदाधिकारीव्दारे त्यांचा सन्मानपत्र देऊण सन्मानित करण्यात आले*
Maharashtra News Media सच की आवाज