*खबरदार! तुम्ही जरी लोकप्रतिनिधी आहात तर मी सुद्धा क्लास वन अधिकारी आहे*
*खात प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार*
*आरोग्य सेवकांची रात्रीला दारू पिऊन धिंगाना*
*लोकप्रतिनिधी यांनी केली आरोग्य सेवकांची पोलिसांत तक्रार*
*खात प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर*
*हे आरोग्य केंद्र की, दारुचा अड्डा ?*
उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : रुग्णाला चांगली सेवा मिळावी याकरिता शासन रुग्णांच्या उपचारासाठी करोडो रुपये खर्च करून आरोग्य केंद्र उभारण्यात आले. व गलेलठ्ठ पगाराचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. रुग्णाला बरोबर सेवाच मिळत नसेल तर ते प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिकारी, कर्मचारी काय कामाचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
असाच प्रकार नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुका अंतर्गत खात येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात घडून आला. चक्क रात्र पाळीला कर्तव्यावर असताना येथील आरोग्य सेवक वासुदेव बेहनिया यांनी दारू पिऊन धिंगाणा घालत सर्वांना आश्चर्य चकित केले. ही घटना दि. ३ जुलै रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. आरोग्य सेवक वासुदेव हा दारू पिऊन असल्याची माहिती काही नागरिकांनी येथील लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्या राधा अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, मौदा पंचायत समिती उपसभापती रक्षा थोटे, माजी पंचायत समिती सदस्य मुकेश अग्रवाल यांना दिली असता, त्यांनी लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. व प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली असता सदर कर्मचारी दारू पिऊन तरर्र नशेत पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत मदहोश आरोग्य सेवकाला जि.प. सदस्या राधा अग्रवाल यांनी हा काय प्रकार आहे असे विचारणा केली असता, मी कर्तव्यावर आहे असे उडवाउडवीची उत्तरे देऊन राहत्या सरकारी घराकडे पळ काढला. व आतून दार लावला. काही नागरिकांनी त्याला बाहेर काढून अरोली पोलिसाकडे नेले.
हा सर्व सावळा गोंधळ पाहता येथील जि. प. सदस्या राधा अग्रवाल, जि. प. सदस्य योगेश देशमुख, मौदा पं. स. उपसभापती रक्षा थोटे, मौदा आरोग्य अधिकारी आर.डी. नारनवरे, पं. स. सदस्य दीपक गेडाम, माजी पं. स. सदस्य मुकेश अग्रवाल यांनी दि. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन येथील आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना मुन यांच्याशी चर्चा करीत असताना यात चांगलेच वातावरण तापले होते. प्रत्येक लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांनी आपापली समस्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना मून यांच्यासमोर मांडली असता, यात आरोग्य अधिकारी डॉ. मून ह्या चांगल्याच् लोकप्रतिनिधि समोर कडाडल्या कोणतीच बाब ऐकूण न घेता उडवाउडवीचे उत्तरे देत तुम्ही जरी लोकप्रतिनिधी आहात तर मी सुद्धा क्लास वन अधिकारी आहे. तुम्हाला माझी जे तक्रार करायची ते करा असे उर्मटपणाची वागणूक लोकप्रतिनिधीला दिली.
यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.डी. नारनवरे यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना सुद्धा डॉक्टर मून यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तुम्ही जरी तालुका अधिकारी असले तर मी सुद्धा तुमच्यापेक्षा क्लासवन ऑफिसर आहे. असे खडसावून सांगितले व डॉ.नारनवरे यांची बोलती बंद केली. हा प्रकार येथे थांबत नसल्याने शेवटी या प्राथमिक आरोग्य केंद्रा बद्दल आपण वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत चर्चा करू असे लोकप्रतिनिधींनी ठरवले व विषय थांबविला.