Breaking News

*महादुला येथे महावितरणचा कर्मचारी कोरोना पाँझिटिव आज आढळला*

*महादुला येथे महावितरणचा कर्मचारी कोरोना पाँझिटिव आज आढळला*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

कोराडी:- वार्ड नंबर 3, झेंडा चौक, महादुला येथील महावितरणच्या कर्मचारी हा महाराष्ट्रात आलेले निसर्ग चक्रीवादळ येथे कर्तव्यावर गेलेला होता. नागपूर ग्रामीण ची एकूण बारा जणांची महावितरण कर्मचा-याची तुकडी तयार करण्यात आलेली होती.

महादुला येथील महावितरण कर्मचारी ची नियुक्ती निसर्ग चक्रीवादळ कोकण मुलुंड याठिकाणी करण्यात आलेली होती. निसर्ग चक्रीवादळ थांबताच महावितरण कर्मचारी तो परत महादुला येते दिनांक 02.07.2020 आपल्या राहत्या घरी महादुला येथे आला. तसेच दिनांक 03.07.2020 नगर पंचायत महादुला कडून महावितरण कर्मचाऱ्यांच्या स्वँब घेतला असून आज दिनांक 05.07.2020 ला महावितरण कर्मचारी कोरोना पाँझिटिव आढळला.

एकूण बारा जणांची महावितरण ची टीम ही कोकण, मुंलूड येथे गेली असता नगर पंचायत महादुला चे मुख्याधिकारी यांच्याकडे एकूण बारा पैकी नऊ जणांचा अहवाल प्राप्त झालेला असून त्यामधील वेगवेगळे ठिकाणाचे पाच पॉझिटिव आढळले असता त्यामधील एक महादुलाचा कोरोना पाँझिटिव सापडला या अगोदरही नगरपंचायत महादुला अंतर्गत व्यक्ती कोरोना पाँझिटिव सापडल्याने सर्वांना 14 दिवस नागपूरला काँरंनटाईन करण्यात आलेले होते. तरी सर्वांचे निकाल निगेटिव्ह आल्याने सर्वांना आपापल्या घरी सुखरूप पाठवण्यात आलेले होते पुन्हा महावितरणचा कर्मचारी महादुला येथे कोरोना पाझिटिव सापडल्याने महादुला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच संपुर्ण परिसर हा सिल करण्यात आलेला आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …