*कुहित युवा मोर्चा करणार विद्युत बिलकरिता मोर्चा*
कुही प्रतिनिधी – निखिल खराबे
कुही:- नागपूर जिल्ह्यातील बहुतेक गावोगावी कोरोना काळातील महावितरण चे विद्युत बिल आलेले आहेत व महाविकास आघाडीसरकारच्या काळात महावितरण ने सर्व ग्राहकांना बिल खुप जास्त(१२००० ते २००००) पाठविले आहेत त्याकरिता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कुही तालुका तर्फे महावितरण ला काही मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असून त्यात

१.कोविड१९ च्या काळात अन्यायकारक व चुकीचे वाढीव बिल रद्द करावे
२.कोविड१९ च्या काळात ३ महिन्याचे प्रति महिना १०० युनिट प्रमाणे ३ महिण्याचे ३०० युनिट्स विज बिल माफ करावे
३.विज बिलावर आकारलेले चुकीचे व्याज व विद्युत आकार रद्द करावा.
४.योग्य बिलाच्या ग्राहकांना ३ किस्त पाडुन द्या व विज बिल भरण्यासाठी सहकार्य करावे
५.तसेच लोडशेडिंग बंद करावि अथवा शेतकर्यांना दिवसा ३ फेज वीजपुरवठा करावा.
अश्या सर्व मागण्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कुही तालुका तर्फे बुधवार दिनांक ८ जुलै रोजी सकाळी १० वाजता महावितरण कार्यालय कुही येथे देण्याचे आयोजण केले असून सर्व युवा मोर्चा कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक यांनी या वेळी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. सोबतच कोविड १९ अंतर्गत आपण सर्वांनी मास्क किंवा रुमाल चेहर्यावर लावुन सोशल डिस्टंन्स मेंटेन करुन महावितरण च्या कुही येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन निलेश चव्हाण यांनी केले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज