*गुरु पोर्णीमा उत्साहात साजरी*

*विशेष प्रतिनिधी नागपूर*
नागपुर– दिनांक 6जुलै2020रोजी नागपुर पश्चिम विभागात पतंजली योग समितीच्या पाचही संघटनेने मिळून गुरुपौर्णिमा उत्सव खूप उत्साहात साजरा केला.
या सोहळ्याचे आयोजन पश्चिम विभाग प्रमुख आदरणीय सौ. मायाताई हाडे ,श्री अरविंद जी हाडे, संगीताताई मेलंग,करुणाताई करंजकर,चित्राताई वंगलवार,सुचित्राताई लिखार, शालिनीताई काकडे,श्रुतीताई शीरोडे व आदरणीय श्रीकांत डोड यांनी मोठ्या उत्साहाने आयोजित केला.या समारंभा चे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र पूर्व च्या महिला प्रभारी आदरणीय शोभाताई भागिया यांनी गुरुपौर्णिमे निमित्त योग वर्ग घेतला.त्यानंतर आमंत्रित पाहुण्यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात केली. मंच संचालन पश्चिम विभाग प्रमुख सौं. मायाताई हाडे यांनी केली. उपस्थित मान्यवरांचे भाषण झाले.

या कार्यक्रमास वार्ड मेंबर् प्रभाग36 च्या आदरणीय adv. मिनाक्षीताई तेलगोटे यांची विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र पूर्व चे ज्येष्ठ मार्गदर्शक व नागपुर जिल्ह्या समन्वय समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रदिपजी
काटेकर, महाराष्ट्र पूर्व ची महिला पतंजली प्रभारी आदरणीय शोभाताई भागीया, प. यों. स. नागपुर जिल्हा प्रभारी आदरणीय छाजुरामजी शर्मा, कोष्याध्यक्ष श्री दिपक जी येवले,महिला पतंजली समितीच्या सहप्रभारी व योग प्रचारिका आदरणीय सौ.माधुरिताई ठाकरे, महामंत्री सौ. रीतुजी जरगर् व नागपुर चे संवाद प्रभारी दीपक जी जरगर उपस्थित होते. आभार प्रदर्शन आदरणीय चीत्राताई यांनी आभार प्रदर्शन केले. समारंभाची सांगता झाल्यानंतर वृक्षारोपण चा सोहळा मान्यवरांचा हस्ते पार पडला.
Maharashtra News Media सच की आवाज