Breaking News

*येलदडमीच्या जंगलात ठार नक्षली पेरमिली दलम कमांडर*

*येलदडमीच्या जंगलात ठार नक्षली पेरमिली दलम कमांडर*

गडचिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुड़कर

गडचिरोली: शुक्रवारी ३ जुलै रोजी एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांभिया पोलिस मदत केंद्रांतर्गत येलदडमी गावानजीकच्या जंगलात ठार झालेल्या नक्षल्याची ओळख पटली आहे. मृत नक्षली हा पेरमिली दलमचा कमांडर असून, कोटे अभिलाष उर्फ चंदर उर्फ शंकर उर्फ सोमा(३६) असे त्याचे नाव आहे.

तो तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यातील कारापल्ली येथील रहिवासी आहे. २००८-०९ मध्ये तो नक्षल दलममध्ये भरती झाला होता. २०१२ पासून तो गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होता. २०१८-१९ मध्ये पेरमिली दलम कमांडरपदाची सूत्रे त्याच्याकडे आली. त्याच्यावर खून, चकमक, जाळपोळ व अन्य असे १५ गुन्हे दाखल असून, शासनाने त्याच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या चकमकीत एक बंदूक, २ प्रेशर कूकर, वायर बंडल, २ वॉकिटॉकी, कॅमेरा फ्लॅश, २० पिट्टू व अन्य साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …