*भाजप चे कटोरा आंदोलन*
*गोळा केलेले 620 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत केले जमा*
*मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निधी परत मागणी बाबतचे परिपत्र रद्द करण्याबाबत चे मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर यांचे मार्फत निवेदन*

*प्रतिनिधी सुरज सेलकर सह दिनेश चौरसिया सावनेर*
सावनेर– *नागपूर जिल्हा तहसील सावनेर नगर परिषद सावनेर येथील भाजपाचे अध्यक्षासह नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी यांच्यामार्फत मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन मागणी करण्यात येते की तत्कालीन भाजपा सरकार कडून विविध कार्यासाठी जिल्ह्यातील नगरपरिषदेला कोट्यावधी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता सध्या महा विकास आघाडी सरकार तर्फे विकास कार्याच्या निधी 67% कटोती तर केलीच आहे आणि त्यावरही सावनेर नगर परिषदेला दलित वस्ती सुधार योजना,नगरोत्थान योजना,नागरी दलित उत्तर योजना,अग्निशमन सेवा नाविन्यपूर्ण योजना यांच्या निधी महा विकास आघाडी सरकार परत मार्ग आहे*

*नगर परिषद सावनेर तर्फे अनेक विकास कामांची निविदा प्रक्रिया व कायदेशीर कार्यादेश देण्यात आलेला आहे व अनेक कामे पूर्णत्वास पोहोचली आहे काही कामांचे धावते देयक सुद्धा देण्यात आलेले आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने निधी परत मागण्याकरिता काढलेले परिपत्रक रद्द करावे तसेच सदर निधी खर्च करण्याकरिता मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ द्यावी ही विनंती सदर बाबींचे निवेदन नगर परिषदेचे भाजपाचे नगरसेवक तथा पक्षाचे पदाधिकारी व महा विकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करून व ‘कटोरी आंदोलन” करून विकास कामात अडथळा आणणाऱ्या या महा विकास आघाडी सरकारला निधी परत मागणी बाबतचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली आहे.*

*याप्रसंगी डॉ राजीव पोतदार यांनी राज्य शासनाच्या कार्यप्रणाली वर जबरदस्त हल्ला चढवत कटोरा आंदोलनातून गोळा करण्यात आलेले 620 रुपये रोख मुख्याधिकारी रवींद्र भेलावे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्याची विनंती केली असता मुख्याधिकारी यांनी ती निधी स्विकारण्यास असमर्थता दाखवल्याने सदर निधी मुख्यमंत्री सहायता निधीत गोळा करण्यात आल्याची माहीती शहर भाजप अध्यक्ष मंदार मंगळे यांनी दिली*
*याप्रसंगी डॉ. राजीव पोतदार, सौ रेखा मोवाडे अध्यक्ष नगर परिषद सावनेर,श्री अरविंद लोधी उपाध्यक्ष नगर परिषद सावनेर,नगरसेवक तुषार उमाटे,आशीष मानकर,अरविंद ताजने,सचिन उइके, रविंद्र ठाकूर,नगरसेविका लक्ष्मी बागडे,स्वाती कांबडी,वनीता घुगल,इंदिरा झोडापे, स्मिता घटे,प्राजक्ता वानखेडे नलीनी नारेकर, प्रभाबाई कमाले,तेजस्विनी लाड सोबतच भाजप चे वरिष्ठ नेते रामराव मोवाडे,भाजप शहर अध्यक्ष मंदार मंगळे,राजु घुगल,अमित झोडापे, सुजीत बागडे,सोनू नवधिंगे, मनिष चित्तेवान,डीगांबर सुरतकर, रत्नाकर ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज