*आघाडी सरकारच्या नीती विरोधात भाजपाचे भिक मांगो आंदोलन*
*नवनिर्मित मौदा न.पं.चे एक कोटी निधी परत*
*निधी अभावी मुलभूत सोयी सुविधावर प्रश्न चिन्ह*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे
मौदा : राज्यात आघाडी सरकार आरुढ होताच सर्वप्रथम मंजूर व प्रस्तावित कामे स्थगित करण्यात आले. व मोठ्या प्रमाणात निधी परत गेले. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, रस्ते, नाल्या साफसफाई, शहर निर्जंतुकीकरण फवारणी, विज बिल व विज खांब, मृत व मोकाट जनावरांची विल्हेवाट अशा अनेक प्रकारच्या मुलभूत सोयी सुविधा वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
निधी अभावी नगरपंचायतीचा विकासरथ थांबला असून आर्थिक स्थिति अत्यंत खराब आहे. मोठ्या प्रमाणावर मंजूर असलेली कामे ठप्प पडलेली आहेत. त्यासाठी सरकारी तिजोरी रिकामी असल्याचे कारण सरकार तर्फे सांगितले जाते. त्यामुळे मजी ऊर्जामंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या निर्देशानुसार मौदा भाजपा शहराच्या वतीने व नागरिकां तर्फे हातात कटोरा घेऊन दुकानदार, भाजी-फळ विक्रेते कडून सांकेतिक “भिक मांगो” आंदोलन राज्य सरकार चा निषेध दि.६ जुलै रोजी करण्यात आले. व जमा झालेले एकूण चार हजार नव्वद रुपये राज्य सरकार च्या तिजोरित जमा करण्यात यावा यासाठी निवेदन तहसीलदार मौदा यांना सादर करण्यात आले.

हे “भिक मांगो” आंदोलन भाजपा शहराध्यक्ष प्रकाश येळने आणि मौदा नगरपंचायतीचे नगराध्यक्षा भारती राजु सोमनाथे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे गटनेते मुन्ना चलसानी, उपाध्यक्षा शालिनी कुहीकर, नगरसेविका सुषमा कुंभलकर, सुनिता पाराशर, वैशाली चव्हाण, विमल पोटभरे, नगरसेवक राजु सोमनाथे, देवा कुंलकर, भीमराव मेश्राम, सुनील रोडे, युवा मोर्चाध्यक्ष देवेंद्र सानगडिकर, शहर महामंत्री रमेश कुंभलकर, प्रकाश कुहीकर, युवा मोर्चा पदाधिकारी शुभम सहारे, राजेश ठोबंरे, राहुल हटवार, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.
Maharashtra News Media सच की आवाज