Breaking News

*पतंजलि योग समिति चे गुरुपूर्णिमा उत्सव साजरा*

*नागपुर पतंजलि योग समिति चे गुरुपूर्णिमा उत्सव साजरा*

नागपुर विशेष प्रतिनिधि

नागपुर–  दिनांक 7जुलै2020रोजी नागपुर दक्षिण विभाग चार येथे, नागपूर जिल्हा पतंजली योग समितीच्या पाचही संघटनेने मिळून गुरुपौर्णिमा उत्सव अती उत्साहात सौ. शारदा ताई वराहडे यांच्या निवासस्थानावर दिघोरी नागपूर येथे साजरा केला.


या सोहळ्याचे आयोजन दक्षिण विभाग प्रमुख आदरणीय
सौ. शारदाताई वरहाडे ,श्री रामभाऊजी वरहाडे,सौ. लता ताई धांडे, सौ.माधुरीताई ठाकरे,सौ.शालूताई चकोले,सौ. सूनंदाताई वंगलवारताई, शुभम पाटील व पुरुषोत्तम वरहाडे यांनी मोठ्या उत्साहाने आयोजित केला.या समारंभा चे विशेष म्हणजे आयोजनाची सुरुवात होमनी झाली. होम हवन चा मंत्र पाठ आदरणीय छाजूरामजी शर्मा यांनी मोठ्या उत्साहाने केला. विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्र पूर्व च्या महिला प्रभारी आदरणीय शोभाताई भागिया यांनी पण या होम हवन मध्ये भाग घेतला. त्यानंतर आमंत्रित पाहुण्यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात केली. मंच संचालन दक्षिण विभाग चार च्या सहयोगी योग शिक्षिका सौं.अर्चनाताई चकोले यांनी उत्साहाने केली. उपस्थित मान्यवरांचे भाषण झाले.


या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे आज गुरुपौर्णिमेच्या विशेष कार्यक्रमांमध्ये आमच्या दोन बहिणींचा वाढदिवस होता. पतंजली योग समितीच्या नागपूर जिल्हा प्रभारी आदरणीय सौ. उर्मिलाताई जुवारकर व सौ. रजनीताई पाटील यांना पतंजली योग पीठ च्या पाचही संघटनेच्या पदाधिकारी व या परिवारातील सहयोगी शिक्षक व साधक यांनी खूप उत्साहाने वाढदिवसाच्या शुभेच्छा व झाडाचे रोप उपहार स्वरूप देऊन सत्कार केला. विशेष म्हणजे सौ. शारदाताई वराडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वागत व सत्कार केला. त्यानंतर सौ शालू ताई चकोले यांनी स्वागत गीत गाऊन आमंत्रित पाहुण्यांचे स्वागत केले. या पाचही संघटनांचे मुख्य पदाधिकारी समारंभास उपस्थित होते.

मुख्य योग शिक्षक सहयोगी योग शिक्षक व कर्मठ कार्यकर्ता सहित योग साधकांची पण उपस्थिती होती. महाराष्ट्र पूर्व चे ज्येष्ठ मार्गदर्शक व नागपुर जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रदिपजी काटेकर, महाराष्ट्र पूर्व ची महिला पतंजली प्रभारी आदरणीय शोभाताई भागीया, प. यों. स. नागपुर जिल्हा प्रभारी आदरणीय छाजुरामजी शर्मा, कोष्याध्यक्ष श्री दिपक जी येवले,महिला पतंजली समितीच्या प्रभारी सौ उर्मिला ताई जुवाकर, आदरणीय राजेंद्र जी जूवारकर, महिला सहप्रभारी व योग प्रचारिका आदरणीय सौ.माधुरिताई ठाकरे,युवा प्रभारी पंकज जी बांते, पतंजली योग समिती सह प्रभारी आदरणीय कमल जी गुप्ता, महामंत्री सौ. रीतुजी जरगर् व नागपुर चे संवाद प्रभारी दीपक जी जरगर उपस्थित होते. आभार प्रदर्शन आदरणीय संजयजी पाटीलसर यांनी केले. समारंभाची सांगता झाल्यानंतर प्रसाद वितरणाचा चा सोहळा सौ. शारदा ताई वऱ्हाडे यांच्या हस्ते पार पडला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …