* पेट्रोल व डिझेलची दरवाढ मागे घ्या *
*नरखेड तालुका काॅंग्रेस कमेटीचे तहसिलदारांना निवेदन *
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरेे
नरखेड़– केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची मोठ्या प्रमाणात दरवाढ करून संपुर्ण भारतात भडका उडविला आहे. यात सर्वसामान्यासह शेतकरी, मजुर तसेच व्यापार्यांना याचा चांगलाच फटका बसला असुन ही दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे नरखेड तालुका काॅंग्रेस कमेटीच्या वतीने तहसिलदार हरीष गाडे यांना नुकतीच करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख उपस्थीती म्हणुन नरखेड तालुका काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष सुदर्शन नवघरे, अनिल कोरडे, मोवाड शहराध्यक्ष डाॅ. सुधीर साठोणे, बारोकर गुरूजी, योगेंद्र बहादुरे, जावेद पठाण, गुलाम अली, समीर भाई, तसेच जफ्फार भाई यांची प्रामुख्याने उपस्थीती होती.
संपुर्ण भारत देशात व महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. गेल्या तीन चार महीन्यापासुन सर्वत्र लाॅकडाऊन सुरू आहे. व त्यामुळे सर्वसामान्य माणुस, मजुर, शेतकरी व व्यापारी हवालदील झालेला असतांना केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलची दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य जनतेवर व शेतकर्यावर ची दर वाढी मुळे कबरडे मोडले आहे.
या महागाईमुळे आर्थिक बोझा वाढलेला आहे.
पेट्रोल व डिझेलचे दर आकाशाला भीडले असुन आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ झाली असल्याचे सिध्द झाले आहे. कोरोना लाॅकडाऊनमुळे कामधंदे ठप्प पडले असतांनाच मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तिव्र रोष निर्माण झाला असुन असंतोष वाढला असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने वाढवीलेली पेट्रेल व डिझेलची ही
दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी अशी मागणी
नरखेड तालुका काॅंग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात येत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज