*वरोरा पोलीसांनी केली अवैध दारू ची तसकार्यान्वर कारवाई*

*50,1000 रुपयांचा मुद्देमाल जप्त*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख सोबत मुजम्मिल शेख
वरोरा – उपविभागीय पोलीस अधिकारी , वरोरा यांचे मौखीक आदेशाने स्टे.डा.साना कं . ३४ वेळ १६/३८ वाजता प्रोव्ही बाबत खांबाळा ते वरोरा रोडवर पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरब्दारे खबर मिळाली की , एक ईसम एका पांढ – या रंगाची सेन्ट्रो वाहन क्र . एम एच ३१ सि आर २१५७ नी खांबाळा येथुन अवैधरित्या दारू घेवुन वरोराकडे येत आहे .खबरेवरून मौजा बोरगाव ( शि ) फाटा नागपुर चंद्रपुर हायवे रोड येथे थांबुन नाकाबंदी केली असता मौजा खांबाळा कडुन येणारी पांढ – या रंगाची हुंडई सेन्ट्रो वाहन क्र . एम एच ३१ सि आर २१५७ हिला थांबवुन सदर गाडीचे चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने स्वत : चे नाव १ ) निरू रामपरवेश यादव , वय २७ वर्ष , रा . टेमुर्डी , ता . वरोरा , जिल्हा चंद्रपुर व त्याचे बाजुचे सिटवर बसुन असलेला दुस – या ईसमाने स्वत : चे नाव २ ) मंगलदेव रामनंदन यादव , वय २१ वर्ष , रा . टेमुर्डी , ता . वरोरा , जिल्हा चंद्रपुर असे सांगीतले . त्यास पंचासमक्ष प्राव्ही बाबत हुंडई सेन्ट्रो वाहन क्र . एम एच ३१ सि आर २१५७ ची झडती घ्यावयाची आहे असे सांगुन नमुद वाहनाची प्रोव्ही बाबत पंचासमक्ष झडती घेतली असता गाडीच्या मागच्या सिटवर एकुन २० नग खरडयाचे खोक्यात रॉकेट संत्रा देशी दारूने भरलेले , प्रत्येक बॉक्स मध्ये प्रत्येकी ९ ० एम.एल च्या १०० प्लॉस्टीक शिश्यानी भरलेले आढळुन आल्याने वाहन चालकास व त्याचे बाजुला बसलेला मंगदेव यादव यास सदर दारू बाबत विचारपुस केली असत त्यांनी मौजा खांबाळा येथे राहणारे अनिल / रवी ज्याचे आडनाव मला माहीत नाही त्याचे कडुन विकत घेवुन ते आम्ही विकण्याकरीता टेमुर्डी येथील एका शेतात लपवून ठेवण्याकरीता जात आहे असे त्यांनी सांगीतल्याने आम्ही पंचासमक्ष नमुद वाहनातुन खरडयाचे २० नग खोक्यात , प्रत्येकी ९ ० एम एल . देशी दारुनी भरलेल्या देशि दारूच्या एकुन २००० नग प्लॉस्टीक निपा किंमत २,00,000 / – रू चा माल व आरोपीने गुन्हयात वापरलेला एक जुना वापरता मायको मॅक्स कंपनीचा मोबाईल किंमत १००० / – रू तसेच जुनी वापरती पांढ – या रंगाची हुंडई सेन्ट्रो वाहन क्र . एम एच ३१ सि आर २१५७ किंमत ३,00,000 / – रू ची अस एकुन ५,०१,000 / – रू चा माल पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून ताब्यात घेतला.तरी नमुद दोन्ही आरोपीतांचे कृत्य कलम ६५ ( ई ) , ( अ ) ८३ मदाका प्रमाणे गुन्हा होत असल्याने नमुद आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करन्यात आले आहे
सदर कारवाही SDPO डॉ नीलेश पांडे पो शी जावेद सिद्दीकी
मधुकर आत्राम पोहवा दीपक मून नपोशी अजय मुड़े नापोशी प्रदीप पाटिल पो शी शुशांत निमगड़े यांचा नेतृत्व वात झाली
Maharashtra News Media सच की आवाज