*AGIPL कंपनीला मनसे ने ठोकलं ताळ*

*स्थानिक मजुरांना कामावरून काढणं सुरू ,मनसे च आंदोलन*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख सोबत मुजम्मिल शेख
वरोरा– लॉकडाउन च्या काळात सर्व मजूर बेरोजगार असताना वरोरा शहराजवळ असलेली AGIPL ही कंपनी स्थानिक मजुरांना कामावरून काढून बिहार उत्तरप्रदेश या राज्यातून मजूर आणून काम करीत आहे.महाराष्ट्र राज्यात 80% स्थानिक मजुरांना कामावर घेण्याचा नियम असताना AGIPL कंपनीची व्यवस्थापन समिती स्थानिकांना कामावरून काढत आहे .तसेच स्थानिकांना काम येत नाही आज तीन मजुरांना काढल पुढे माझ्या मर्जीने काढील असे स्थानिक मजुरांना म्हटल्याचे समजते.

स्थानिक मजुरांनी या घटनेची माहिती देताच मनदीपभाऊ रोडे शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली AGIPL कंपनीला टाळ ठोकण्यात आले .स्थानिक मजुरांना कामावरून काढले जात असेल तर मनसे कंपनी चे काम चालू देणार नाही असा इशारा दिला आहे . आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे प्रशांत जुंजारे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे ,गौरव मेले तालुका अध्यक्ष , प्रशांत बदकी तालुका उपाध्यक्ष ,आकाश ठावरी शहर अध्यक्ष ,कल्पक ढोरे शहर उपाध्यक्ष आणि पदाधिकारी हजर होते
Maharashtra News Media सच की आवाज