*विज बिल समूळ माफ करा*
*नरखेड तालुका शेतकरी संघटनेचे विद्युत अभियंत्यांना निवेदन*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
नरखेड़– आंम्हाला विज बिलात सवलत नको, हप्ते पाडुन नको, तर माफीही नको, कारण माफ करण्याचा गुन्हा आम्ही केला नाही.तर हा गुन्हा कोरोनाने केलाआहे. हा गून्हा आमच्यावर का लादता ? एप्रील ते माहे जून पर्यंत कोरोना संसर्गाने सर्वत्र लाॅकडाऊन असल्यामुळे सरकारने जाहीर केले होते की, विज बिलाचे पैसे ग्राहकांना मागु नये. तरी आमच्यावर ही सक्ती का ? त्यामुळे सरकारने विज बिल समुळ माफ करावे अशा मागणीचे निवेदन नरखेड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने मोवाड येथील विद्युत
वितरण कार्यालयात अतिरीक्त कार्यभारावर असलेले जुनियर अभियंता श्री. शेख यांचेकडे नूकतेच देण्यात आले आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समीतीच्या वतीने संपुर्ण राज्यभरात दी. १ जुलै ते १० जूलै पर्यंत विज बिल विरोधी, विज बिल वापसी अभियान रावविण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर मोवाड येथे शेतकरी संघटनेच्या वतीने औपचारीकता म्हणून हे विज बिल वापसी अभीयान नुकतेच राबविण्यात आले आहे, कोरोनाच्या काळात उद्योग, व्यापार, शेती व रोजगार सर्वत्र बंद असतांनी महाराष्ट्र सरकारने विज बिलात भरमसाठ वाढ करून
ग्राहकांची लुटमार लावली आहे. विज बिल भरने असहनीय होत असुन कोरोना संपेपर्यंत विदर्भातील जनतेला बिज बिलातुन मुक्त करा,३०० युनीट पर्यंत विज बिल फ्री करा, तर नंतरच्या युनीटचे दर निम्मे करा, शेती पंपाचे बिल संपवा, विदर्भाला प्रदुषण मुक्त करा. अशा मागण्या सदर निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष वसंतराव वैद्य, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र बहुरूपी, जानरावजी नेवले, रघुनाथ नेवले, पुंडलीकराव खसारे, किसनाजी बनाईत, रविंद्र देवते, प्रमोद जोशी,प्रकाश वालुरकर,वसंत बहरूपी,नामदेव दुहीजोड,कोमल राऊत, मोतीराम लिखार ,विनायक चक्रपाणी हे सर्व शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज