*कोरोना ब्रेंकीग* *24 वर्षीय युवकास कोरोंनाची  लागन* *गुजरात ट्राव्हल हिस्ट्री*

*कोरोना ब्रेंकीग*


*24 वर्षीय युवकास कोरोंनाची  लागन*

 

*गुजरात ट्राव्हल हिस्ट्री*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरशहरातील 24 वर्षीय युवकाला कोरोना ची लागन झाल्याची धक्कादायक माहीती आज उघडकीस आली*

*मिळालेल्या अधिकारीक माहिती नूसार सदर युवक हा गुजरात राज्यातील सुरत नजिकच्या एका आँईल कंपनी मधे कर्तव्यावर असल्याची माहिती असून दि. 9 जुलै रोजी तो गुजरात वरुण सावनेर ला आला असता त्याची तपासणी करण्यात आली होती त्यानुसार त्याची रिपोर्ट पाँजेटिव्ह आढळली असुन तो गुजरात च्या सुरत येथेल कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याची विश्वसनीय माहीती पुढे येत आहे*


*आढळलेला रुग्ण हा सावनेर शहरातील महाजन लेआऊट परिसरातील रहवासी असुन सदर रुग्णांस पुढील उपचाराकरिता पुर्ण दक्षतेने नागपूर रवाना करण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर कोवीड़19 चे प्रभारी डॉ भुषन सेंबेकर व डॉ. संदीप गुजर यांनी दीली असुन सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटवून त्यांना विलगीकरण व सदर प्रभाग सील करण्याच्या कामाला वेग आला असुन तहसील कार्यालय तसेच मुख्याधिकारी रविंद्र भेलावे व त्यांचे अधिनस्त अधिकारी कर्मचारी उदभवलेल्या परिस्थितीवर नजर ठेवून पुढील उपाययोजना करत आहेत*

*सावनेर उप विभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, स्थानिक प्रशासन व महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या वतिने नगरवासियांना निवेदन करण्यात येते की कोवीड़19 विषाणूंच्या वाढता प्रादुर्भाव बघता आपण आपल्या घरीच राहुन सहकार्य करावे.अतीआवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे,गर्दीचे ठीकाण टाळावे व कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोर पणे पालन करावे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …