Breaking News

*कोरोना ब्रेंकीग* *महाजन लेआऊट येथील 24 वर्षीय युवकास लागन* *गुजरात ट्राव्हल हिस्ट्री* *रुग्णाला नागपूर तर रुग्णाच्या परिवारासह 11 परिवाराचे 48 होम कोरंटाईन तर सात सावनेर पब्लिक स्कुल येथील विलगीकरण कक्षात*

*कोरोना ब्रेंकीग*

*महाजन लेआऊट येथील 24 वर्षीय युवकास लागन*

*गुजरात ट्राव्हल हिस्ट्री*

*रुग्णाला नागपूर तर रुग्णाच्या परिवारासह 11 परिवाराचे 48 होम कोरंटाईन तर सात सावनेर पब्लिक स्कुल येथील विलगीकरण कक्षात*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरशहरातील महाजन लेआऊट येथील गुजरात वरुण आलेल्या 24 वर्षीय युवकाला कोरोना ची लागन झाल्याची धक्कादायक माहीती आज उघडकीस आली*

*मिळालेल्या अधिकारीक माहिती नूसार सदर युवक हा गुजरात राज्यातील सुरत नजिकच्या एका आँईल कंपनी मधे कर्तव्यावर असून दि. 9 जुलै रोजी तो गुजरात वरुण सावनेर ला आला असता त्याची तपासणी करण्यात आली होती त्यानुसार त्याची रिपोर्ट पाँजेटिव्ह आढळली असुन तो गुजरात च्या सुरत येथेल कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याची विश्वसनीय माहीती पुढे येत आहे*


*आढळलेला रुग्ण हा सावनेर शहरातील महाजन लेआऊट परिसरातील रहवासी असुन सदर रुग्णांस पुढील उपचाराकरिता पुर्ण दक्षतेने नागपूर रवाना करण्यात येत असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर कोवीड़19 चे प्रभारी डॉ भुषन सेंबेकर व डॉ. संदीप गुजर यांनी दीली असुन सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटवून त्यांना विलगीकरण व सदर प्रभाग सील करण्याच्या कामाला वेग आला असुन तहसील कार्यालय तसेच मुख्याधिकारी रविंद्र भेलावे व त्यांचे अधिनस्त अधिकारी कर्मचारी उदभवलेल्या परिस्थितीवर नजर ठेवून पुढील उपाययोजना करत आहेत*

*11 परिवारातील 55 लोक 28 दिवसाकाठी कोरंटाईन*

*पाँजेटिव्ह आढळलेल्या युवा रुग्णांच्या घरा शेजारच्या जवळपास 11 घरांना जाणाऱ्या रस्त्यावर नगर प्रशासनाव्दारे कठडे लावून नियमानुसार पुढील 28 दीवसाकरीता सील करण्यात आले असुन पीडित रुग्णांच्या आई वडिलांच्या सह परिसरातील 48 नागरिकांना होम कोरंटाईन करण्यात आले असून पिडीत रुग्णाच्या घराचे बांधकाम सुरु असल्याने तीथे काम करणाऱ्या 7 कामगारांना सावनेर नागपूर रोड बोरुजवाडा उड्डाणपूल नजिकच्या सावनेर पब्लिक स्कुल येथील विलगीकरण कक्षात पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले आहे सोबतच सील केलेल्या प्रभागातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्या करिता परिसरातील काही युवांनी पुढाकर घेत आपल्या सामाजिक दाईत्वाचा परीचय दीला*

*सावनेरकरांना निवेदन*

*सावनेर उप विभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक कारंडे,नायब तहसीलदार चैताली दराडे,मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, स्थानिक प्रशासन,पोलीस निरीक्षक अशोक कोळी सोबतच महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या वतिने नगरवासियांना निवेदन करण्यात येते की कोवीड़19 विषाणूंच्या वाढता प्रादुर्भाव बघता आपण आपल्या घरीच राहुन सहकार्य करावे.अतीआवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे,गर्दीचे ठीकाण टाळावे व कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोर पणे पालन करुण सहकार्य करावे असे निवेदन केले आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …