Breaking News

*अखेर मौद्यात कोरोनाचा शिरकाव* *नागरिकांत दहशतीचे वातावरण* *प्रशासनाची डोकेदुखी वाढली*

*अखेर मौद्यात कोरोनाचा शिरकाव*

*नागरिकांत दहशतीचे वातावरण*

*प्रशासनाची डोकेदुखी वाढली*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदामौदा येथील एनटीपीसी पॉवर हाऊस मध्ये काम करण्याकरिता उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यामतून आलेला ४८ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉजीटिव्ह निघाल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

कोरोना पॉझिटीव्ह निघालेला इसम व त्याच्या संपर्कात येणाऱ्या ३० ते ३५ लोकांना क्वारंटाइन करण्यात आले. हा रुग्ण उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यामतून शुक्रवार दि.१० जुलै रोजी रात्री मौदा येथील न्यू शिवनगर येथे पोहचला. शनिवारला सकाळी त्याला स्वाब चाचणी करिता पाठविण्यात आले होते. परंतू दुर्दैवाने त्याची रिपोर्ट सोमवार दि. १३ जुलै रोजी दुपारी २ वाजता पॉझिटीव्ह आल्यामुळे त्याला नागपूर येथील कोविड केअर मध्ये पाठविण्यात आले. कोरोना पॉझिटीव्ह निघल्याची माहिती पसरताच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, मौदा तहसिलदार प्रशांत सांगळे, मुख्याधिकारी कोमल कराळे यांनी किरायाने राहत असलेला परिसर सील करून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले.

नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने वेळोवेळी सुचविलेल्या कोरोना संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करून अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. कोरोनाचे लक्षणं दिसू लागल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाला कळविण्याचे आवाहन मौदा तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी महाराष्ट्र न्युज मीडीयाशी बोलताना केले आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …