Breaking News

*लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा* *संकेत दुरुगकर स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाड़ी जिल्हा अध्यक्ष नागपुर याची नरखेड तहसीलदारांना निवेदनातुन केली मागणी*

*लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करा*

*संकेत दुरुगकर स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाड़ी जिल्हा अध्यक्ष नागपुर याची नरखेड तहसीलदारांना निवेदनातुन केली मागणी*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

नरखेडकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने विजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची विज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. या अन्यायकारक बिलांबाबत महावितरणचा निषेध नोंदविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाड़ी जिल्हा अध्यक्ष नागपुर संकेत दुरुगकर यांच्या नेतृत्वात नरखेड़ तहसीलदार हरीषजी गाड़े साहेब यांना निवेदन देण्यात आले व बिले जाळून त्यांची होळी करण्यात आली. सदर वाढीव बिले माफ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज फक्त वीजबिले जाळली,जर विज बिले माफा नाही झाले तर यानंतर मोठे आंदोलन करणेत येईल.

कोरोना काळात ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले देण्यात आले आहे. राज्यभरात वीजबिलांचा मोठा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी व प्रा. एन.डी.पाटील यांनी वीज बिलांच्या विरोधातील आंदोलनाचे आवाहन केले होते. त्याच अनुषंगाने आज १३ जूलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष संकेत दुरुगकर यांचे नेतृत्वात नरखेड़ तहसिल कार्यालयसमोर वीजबिलांची होळी करण्यात आली. प्रचंड नारेबाजी करत वीजबिलांची होळी करून आंदोलकांनी महावितरणच्या विरोधात रोष व्यक्त केला. तहसीलदार गाड़े साहेब यांच्या मार्फ़त मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व उर्जामंत्री ना.नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शुभम बोडी , मयुर रेवतकर , लकी ठोम्बरे , प्रतीक नेवले , मयुर भोयर यांच्यासह शेतकरी स्वाभिमानीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …