Breaking News

*वेलतुर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. वैरागडे यांच्या निलंबनाची मागणी*

*वेलतुर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. वैरागडे यांच्या निलंबनाची मागणी*

कुही प्रतिनिधि- निखिल खराबे

कुही:- वेलतुर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. श्री. किशोर कुमार वैरागडे यांच्या निलंबनाची मागणी करत आंभोरा( खुर्द) चे गावकरी व शिवसेना कुही च्या वतीने वेलतुर चे ठाणेदार कविराज यांना निवेदन देण्यात आले. आंभोरा (खुर्द) ग्रा.पंचायत चे उपसरपंच राजू कुकडे हे गावातीलच बळीराम सेलोटे नामक व्यक्तीच्या घरी मध्यस्थी करत भांडण सोडविण्याकरिता गेले होते. पण बळीराम कुकडे यांनी थेट उपसरपंच राजू कुकडे यांच्याच विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
विशेष म्हणजे बळीराम सेलोटे यांच्या तक्रारी नंतर कुठलीही शहानिशा न करता पी.एस.आय. वैरागडे यांनी आकसापोटी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप आंभोरा चे उपसरपंच राजू कुकडे यांनी केला आहे. कुकडे हे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख असल्याने पक्षाच्या विरोधात नेहमीच असे कृत्य केले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी ह्याच वैरागडे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाची महाराज यांच्या प्रतिमेला लाथा मारून त्यांची अवहेलना केली होती. तद्नंतर शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळेच वैरागडे हे राजकीय सूड घेत असल्याचे आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.असे अनेक कृत्य करणाऱ्या वैरागडे यांची चौकशी करून निलंबण करण्याची मागणी करण्यात आली. सदर निवेदन देण्याकरिता शिवसेनेचे तालुका प्रमुख हरीश कडव, आकाश भोयर, सरपंच संघटनेचे जितेंद्र गोंडाने ,माजी पं. स.उपसभापती संजय वाघमारे, राजुभाऊ कुथे, संजय भोयर,सुहास धारगावे प्रदीप कारेमोरे, निखिल धानोरकर, शालू कांबळे, सरिता शेंडे, मीना आंग्रे, ललिता कांबळे व शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी व आंभोरा येथील नागरिक फिजिकल डिस्टनसिंग चे काटेकोर पणे पालन करत मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …