Breaking News

*योगेश्च चित्तरुपेन* *प्रस्तुतकर्ता दिपक येवले नागपूर* *लेख क्रमांक 9*

*योगेश्च चित्तरुपेन*

*प्रस्तुतकर्ता दिपक येवले नागपूर*

*लेख क्रमांक 9*

मागील लेखा मध्ये आपण पंचकोशा बद्दल माहिती पाहत होतो, त्यातला पाचवा कोश म्हणजे आनंदमय कोश आज आपण या कोशाबद्दल माहिती पाहू.
आनंदमय कोश:-या कोशाचा संबंध आपल्या जीवनातील आंतरिक जीवनाशी आहे. बाहेरील जीवनात या कोशाचा संबंध फार कमी येतो. आपल्या शरीराचे अस्तित्व आणि जगा मधले सगळे व्यवहार याच कोशावर आधारित आहे, यामुळे आपले जीवन सदा आनंद मय राहते.
आनंद म्हणजे आपल्याला होत असलेली प्रसन्नता किंवा भौतिक सुखांना मुख्यत्वे करून आपण आनंद मानत असतो. कधी आपण एखादी वस्तू आपल्या मनाप्रमाणे बर्‍याच वर्षा पासून मनात ठेवून, काही वर्षानंतर जमले त्यावेळेस ती घेतली तर, आपल्याला आंतरिक प्रसन्नता वाटते. पण ही प्रसन्नता किंवा ते सुख, तो आनंद, खूप दिवस टिकत नसतो. काही दिवसानंतर आपल्याला ही गोष्ट आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे बाकी गोष्टी असतात त्याचप्रमाणे ती वाटते. त्याचे महत्त्व कमी होऊन जाते.कधीकधी एखाद्याशी आपली शत्रुत्वता असते. काही कारणामुळे त्याचे नुकसान झाले, त्याला काही इजा, झाली तरी आपल्याला आनंद किंवा प्रसन्नता वाटते. कारण आपल्या मनासारखे झालेले असते. तो आनंद, आनंद न राहता, त्या आनंदाला कुठल्याही प्रकारचे महत्त्व राहत नाही. ज्यावेळेस आपण योग प्राणायाम करतो, त्या नंतर काही दिवसानंतर आपला आंतरिक आनंद जागृत होतो. बहुतेक आनंद लहान मोठ्या गोष्टीत आपल्याला होत असतो.पण तो क्षणिक असतो. परंतु जर आपल्याला दीर्घकाळ आनंदी राहायचं असल तर आपल्या आंतरिक शरीरामध्ये आनंदमय कोश प्राणायाम केल्या मुळे आपल्याला आनंदी ठेवण्यास मदत करतो. आनंदी राहण्यासाठी आपणास संयमाच्या पथावर चालावं लागतं आणि दुःख व सुख एकाच रस्त्याचे प्रतीक आहेत असे मानून, स्वतःचे चित्त निरंतर ईश्वर चरणी ठेवून, पवित्र भाव मनामध्ये ठेवून, आपली पवित्र भावना जागृत ठेवल्याने आनंदाची अनुभूती होत असते. आनंद काय आहे आणि याला समजने, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या अध्यात्मिक अभ्यासाने, ईश्वर, प्राण, इंद्रिय, मन या विषया च्या ज्ञानाने, आपली बुद्धी प्रकाश मय होते. जीवनातलं वास्तविक सत्य आपल्याला समजते. आणि ती शक्ती आनंदमय कोश वाढवण्यासाठी आवश्यक आहे. नियमांचं पालन करून आपल्या आंतरिक शक्ती ची वृद्धी करून आज च्या जीवन अभ्यास करुन आनंदाची प्राप्ती होऊ शकते. आनंद हे भौतिक सुखात नाही ते आपल्या आत्म्यात आहे.
पुढील लेख दहा मधे प्राणायाम करण्या अगोदर काय काळजी घ्यावीलागते त्या बद्दल माहिती पाहू.
अधिक माहिती साठी
दीपक ना. येवले
नरेंद्र नगर नागपुर.
दूरध्वनी क्रमांक:-09373100862

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …