*मोवाड नगरपरिषद चे मुख्यधिकारी यांना निरोप व सत्कार व नवीन मुख्यधिकारी यांच्या परीचय*
नरखेड तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
मोवाड- नगर परिषदेला दि.१८ फेब्रुवारी २०१६ पासून मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम याचा कार्यकाळ सुरु झाला.हा कार्यकाळ मोवाड शहरातील जनता नेहमी आठवणीत ठेवेल असा राहीला व तो एक ईतिहास बनेल अशा प्रकारे आहेत .या आठवणीला उजाळा देण्यासाठी मोवाड नगर षरिषदेच्या सभाग्रहात मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांच्या सर्व राजकीय पक्षाकडून व मोवाड वर्धा नदीखोलीकरण फांउडेशन व कोरोनाफायटर टिम कडून व मोवाड शहरातील पत्रकार टिम यांच्या सर्वकडून सत्कार समारंभ संपन्न झाला.
या निरोप समारंभची सुरुवात ही मोवाड नगर परिषदेच्या समोर पिपंळाचे झाड लावुन करणेत आली .कि जेणे करून येणारे पिढीला एक आठवण राहील की हे झाड मुख्यधिकारी मेश्राम सर याची आठवण नेहमी करून देईल की यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले माजी कुलगुरू सुभाष पुरी सर माजी न.प.अध्यक्ष सुरेश खसारे,माजी न.प.अध्यक्ष अनिल साठोणे ,नवीन नियुक्त मुख्यधिकारी प्रविण मानकर सर व निरोप सत्कार मानकरी मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम सर व शंकर घोरसे ,ईसमाईल बारूदुवाले तसेच मोवाड शहरातील मिडीया टिम पत्रकार बांधव अनिल ढोके,राजेंद्र बागडे,आविनाश गजभिये,श्रीकांत मालधुरे याची पण प्रमुख उपस्थिती होती व ईतर पदाधिकारी व मोवाड शहरातील प्रतीष्टीत नागरिक व कोरोना फायटर टिम २०१६ ते २०२० या चार वर्षांपासून मुख्यधिकारी मेश्राम साहेब यांच्या कार्यकाळ हा अतिशय मोवाड शहरासाठी विकास मय राहीला .या चार वर्षाच्या कालावधी मध्ये स्वच्छता सर्वेक्षण ,मोवाड वर्धा नदी खोलीकरण आसो ,किवा मोवाड शहरातील झाडाची लागवड आसो,मोवाड वाचनालय दुरुस्ती करण,,पंतप्रधान घरकुल योजना ,कोरोना वर उपाय योजना अशा अनेक समस्या आपले बुद्धीचातुर्याने सहज पणे सोडविण्यासाठी म्हणून मुख्यधिकारी मेश्राम सर मोवाडवाशी यांच्या लक्षात राहिल यासारखे कर्तबगार,कर्तव्यदक्ष,मेहनती,मनमेळाऊ,समजुदार, मुख्यधिकारी यांना निरोप जळमनाने मोवाडवासी यांनी दिले.