*जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्य कार्यपालन अधिकारी यांची आढावा बैठक*
*वाढत्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्देशित उपाययोजनांचे काटेकोर पणे पालन करुण वाढती कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यावर भर*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः सावनेर तहसील कार्यालय परिसरात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.रविन्द्र ठाकरे व जिल्हा कार्यपालन अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील उपविभागीय अधिकारी आतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक कारंडे,नायब तहसीलदार,नगराध्यक्ष, नगर उपाध्यक्ष,तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, कोवीड़ 19 चे नियमित सर्वेअर,पर्यवेक्षक, प्राथमिक आरोग्य केन्द्राचे अधिकारी, खाजगी डाँक्टर्स पत्रकार बांधव आदिंच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली*
*सदर बैठकीत शासकीय स्तरावर सुरू असलेल्या कोवीड़ 19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजना वर तपशीलवार आढावा घेत वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मीळवीण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे सुरु असलेले प्रयत्न व त्यांना सर्वेक्षणात येत असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासनास योग्य सुचना देण्यात आल्या असुन,ग्रामीण भागातील क्रियावंत असलेले अस्थाई कोरंटाईन सेंटर व स्वँब टेस्टींग सेंटर मधील सोई सुवीधेतील कमतरता आदिंवर तसेच स्थानिक खाजगी डाँक्टर्स,जनप्रतिनीधी,पत्रकार बांधव व उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सुचनावर तातडीने उपाययोजना आखणी करुण त्या लवकरात लवकर सोडवीण्याची व्यवस्था करणे आदिंवर संबधीत अधिकारी यांना मार्गदर्शन करीत कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवून आपले शहर व तालुक्यातील प्रत्येक गाव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करुण शासनास सहकार्य करावे असे मार्गदर्शन मा.जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे व मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी करत सध्या परिस्थितीत सावनेर तालुका सह उपविभागीय स्तरांवर सुरु असलेल्या कोवीड 19 चे कार्य व कोरोना विषाणूंची लागन झालेल्या रुग्णाची नियंत्रणात असलेल्या संख्येवर समाधानी व्यक्त केली हे विशेष*
*आढावा बैठकीचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी तर संचालन व आभार तहसीलदार दिपक कारंडे यांनी मानले*
*सदर आढावा बैठकीस नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे, नगर उपाध्यक्ष अँड् अरविंद लोधी,नगरसेवक निलेश पटे,नायब तहसीलदार सतिष मसाळ,चैताली दराडे,जयसिंग राठोड,गजानन जवादे,न.प.सावनेर चे मुख्याधिकारी रविंद्र भेलावे,पंचायत समिती सावनेर चे विस्तार अधिकारी अनील नागने,प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़19 चे प्रबंधक डॉ. भुषण सेंबेकर, डॉ. संदीप गुजर,इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रविण वाकोडे,वरिष्ठ चिकित्सक डॉ. विजय धोटे,डॉ. शिवम पुण्यानी,डॉ.बाहेती ,सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी, माजी नगरसेवक व पत्रकार लक्ष्मीकांत दिवटे,पत्रकार विजय पांडे,सोशल मिडिया चे सुरज सेलकर,दिनेश चौरसिया,तालुक्यातील सर्व पर्यवेक्षक व सर्वेक्षक प्रामुख्याने उपस्थित होते*
Maharashtra News Media सच की आवाज