Breaking News

*सावनेर नगर प्रशासन सख्त* *सोशल डिस्टंन्सींग सोबतच तोंडावर मास्क नसलेल्यांची खैर नाही* (रविंद्र भेलावे मुख्याधिकारी न.प.सावनेर)

*सावनेर नगर प्रशासन सख्त*

 

*सोशल डिस्टंन्सींग सोबतच तोंडावर मास्क नसलेल्यांची खैर नाही*

(रविंद्र भेलावे मुख्याधिकारी न.प.सावनेर)

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत सुरज सेलकर*

*सावनेरः दिवसेंदिवस कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव सोबतच नागरिकांच्या वाढत्या निष्क्रियते मुळे केव्हाही मोठा अनर्थ होऊण शहरात कोरोना विषाणू बाधितांची संख्यास्फोट होऊण स्थीती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सदु्ष्य चित्र सर्वत्र बघावयास मीळत आहे*

*अनलाँक 2 मधे राज्य शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करित स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सवलतीचा गैरफायदा उचलत जनसामान्य नागरिक बाजारात व मुख्य रस्त्यावरील वाढती गर्दी त्यातून सोशल डिस्टंन्सींग ची धींड काढत असुन बाजारात अथवा रस्त्यावर फीरतांना तोंडावर मास्क नाही अशी अवस्था सर्वत्र दिसुन येत असल्याने “कोवीड़ 19 या कोरोना विषाणूंचे गांभीर्याचा नागरिकांना जणुकाही विसर पडत असुन खुलेआम फीरत असल्याने अश्यांवर योग्य दंडात्मक कारवाई करुण त्यात कमतरता आणून परिस्थिती हातळण्याकरिता नगय प्रशासनास घाम गाळावा लागत आहे.*

*याच अनुशंगाने दि.15 जुलै रोजी नगर परिषद सावनेर चे मुख्याधिकारी रविन्द्र भेलावा ,अधिकारी बुधे,पंकज छेनीया, धिरज देशमुख आदिंच्या मार्गदर्शनाखाली नगर प्रशासनाचे इतर कर्मचाऱ्यांचा ताफा नगर पालिका कार्यालयापुढील गांधी चौकात डेरादाखल होऊण रस्त्यावर सोशल डिस्टंन्सींग चा फज्जा उडविनार्या सोबतच तोंडावर मास्क न लावणार्यावर कारवाई करण्याचा सपाटा सुरू झाल्याने नागरिकांत एकच खळबळ उडाली व त्यांना दंडात्मक कारवाईस बाध्य व्हावे लागले*

*आज पार पडलेल्या कारवाईत तोंडावर मास्क न लावणार्या एकुण 37 लोकांवर केलेल्या प्राथमिक कारवाईतून अंदाजे “अकरा हजार” रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहीती असून सदरहू कारवाई नियमितपणे सुरु राहण्याची स्विकु्ती मुख्याधिकारी रविंद्र भेलावे यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती देत सांगीतले की कोवीड़ 19 दरम्यानच्या कारवाईत आजवरच्या कालावधीत अंदाजे दोन लक्ष रुपयांचा दंडात्मक निधी वसुली करण्यात आल्याचे सांगत अश्याच प्रकारच्या कारवाया निरंतर सुरु राहण्याचा विश्वास व्यक्त केला.पार पडलेल्या कारवाईत अनेकवेळा नागरिकांनी नगर पालिका कर्मचारी अधिकार्यांशी वाद घालण्यात आल्याचे ही दिसून आले तर नगर प्रशासनाच्या सदरहू कारवाई दरम्यान पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित नसल्याने ही नागरिकांनी नगर प्रशासनाच्या कर्मचार्यांना विठीस धरण्यात हयगय केली नाही.*

*मुख्याधिकारी रवींद्र भेलावे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या कारवाईत पंकज छेनीया,धिरज देशमुख, दिनेश बुधे,अनिल गोवर्धन,नितीन चाचरकर,अमोल कांम्बडे,रिजु पारधी, सुरज ढोके,प्रसाद कोरमकर,योगेश विनखेडे,रोशन घटे,आदिंनी भाग घेतला*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …