*विनयभंग करणारा पोलिस कर्मचारी बडतर्फ*
*पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची कारवाई*
मुख्य संपादक- किशोर ढूंढेले
*नागपूर ता.17ः सायबर सेल येथील पोलिस शिपाई तुलाराम चटप यांनी फिर्यादीला तिच्या तक्रारीचे अनुशंघाने पोलिस मुख्यालय नागपूर ग्रामीण येथील शासकीय निवास स्थानातील त्यांचे राहते घरी बोलावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी नागपूर ग्रामिण चे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी पो.शि. तुलाराम चटप ब.नं. 337 यास भारतीय संविधान कलम 311(2) अन्वये पोलिस खात्यातून बडतर्फ केल्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले.*
*मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी/पीडिता वय (25) वर्षीय यांच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लील मॅसेज येत असल्याने फिर्यादी ही तक्रार देण्याकरीता दिनांक 09/07/2020 रोजी पो. स्टे. अरोली येथे गेली. अरोली पोलिसांनी तक्रार घेवून पुढील कारवाई करीता फिर्यादीला अर्जासह सायबर सेल नागपूर ग्रामीण येथे जाण्यास सांगीतले. दिनांक 14/07/2020 रोजी फिर्यादीने सायबर सेल येथे जावून तक्रारीची प्रत दिली.*
*दिनांक 16/07/2020 रोजी सायबर सेल येथील पोलिस शिपाई तुलाराम चटप यांनी फिर्यादीला तिच्या तक्रारीचे अनुशंघाने सायंकाळी 06.00 वा. सुमारास पोलिस मुख्यालय नागपूर ग्रामीण येथील शासकीय निवास स्थानातील त्यांचे राहते घरी बोलावून तिचा विनयभंग केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून पो. स्टे. कपिल नगर, नागपूर शहर येथे अप क्र. 317/2020 कलम 341, 354 भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.*
*सदर घटनेची नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी आरोपी तुलाराम चटप याला तात्काळ ताब्यात घेण्याची स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिली. त्या अन्वये स्थानिक गुन्हे शाखेेच्या पथकाने आरोपी तुलाराम चटप यास ताब्यात घेवुन पो. स्टे. कपिल नगरचे स्वाधीन केले.*
*सदर घटनेची पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी गंभीर दखल घेवून पो. शि. तुलाराम चटप ब.नं. 337 यास भारतीय संविधान कलम 311(2) अन्वये पोलिस खात्यातून बडतर्फ केल्याचे आदेष निर्गमीत केला.*
*पोलिस खात्याची प्रतिमा पणाला लावणार्यांची गय केल्या जाणार नाही*
*पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी पोलिस खात्याची प्रतिमा मलिन करणारे कोणतेही गैरकृत्य अथवा गैरवर्तन केल्यास त्यांची गय केली जाणार नाही व त्यांचे विरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा नागपूर ग्रामीण चे पोलिस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी दिला आहे.*