Breaking News

*बोरडा सराखा येथील कोरोना पोजिटीव्ह असणारी तरुणीचा अहवाल आला निगेटिव्ह* *ही बातमी बोरडा वासीयांसाठी आनंदाची ठरली !*

*बोरडा सराखा येथील कोरोना पोजिटीव्ह असणारी तरुणीचा अहवाल आला निगेटिव्ह*

*ही बातमी बोरडा वासीयांसाठी आनंदाची ठरली !*

मनसर प्रतिनिधी :- पंकज चौधरी

मनसरवडिलांच्या घरी लॉक डाऊन अगोदर प्रसूती साठी ती महिला आली होती.ज्यावेळी प्रसूती साठी मनसर येथील दवाखान्यात तिला नेण्यात आले होते,त्यावेळी तिच्या बाळाचं वजन कमी असल्या कारणाने तिला रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले होते.तिथून सुद्धा तिला नागपूर येथील डागा रुग्णालयात रेफर करण्यात आले होते..ती तरुणी नागपूर ला गेल्यानंतर तिथे तिला कोरोना ची लागण झाली होती.त्यानंतर तिला आणि तिच्या आईला व नवऱ्याला क्वारनटाईन करण्यात आले होते.व तिच्या वडिलांच्या घरी आरोग्य विभागाची टीम जाऊन घरच्या सर्व सदस्यांना शाळेत क्वारनटाईन करण्यात आले होते.आता काही दिवसांतच त्या तरुणीचे अहवाल निगेटिव्ह आले असून शाळेमध्ये
क्वारनटाईन केलेल्या सर्व परिवाराचे देखील अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत…ही बातमी बोरडा वासीयांसाठी आनंदाची ठरली आहे..यानंतरसुद्धा गावातील लोकांनी यासंबंधीची काळजी घ्यावी,सर्वांनी मास्क आणि सॅनिटायजर चा वापर करावा,कामानिमित्तच घराबाहेर पडावे अश्या काही सूचना गावातील आरोग्य सेविका सौ.निंबाळकर मॅडम,टोंगसे साहेब,गावातील सरपंच आणि पोलीस पाटील यांनी सांगितले आहे…

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …