Breaking News

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश* *कॅबिनेट मंत्री मा सुनिल केदारांनी केले अभिनंदन*

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश*

*कॅबिनेट मंत्री मा सुनिल केदारांनी केले अभिनंदन*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

*पाटणसावंगी-  स्व. आनंदरावजी पाटील केदार कनिष्ठ महाविद्यालय, पाटणसावंगी, महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालया खापरखेडा,महाराष्ट्र कला क. महा.सिल्लेवाडा आणि कोलवास्वामी कनिष्ठ महाविद्यालय धापेवाडा येथील वर्ग १२ च्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी घवघवीत यश प्राप्त करुन उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.*

*नुकताच वर्ग १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला स्व. आ. पाटील केदार कनिष्ठ महाविद्यालय पाटणसावंगी येथील एकुण निकाल ९१ टक्के लागला असून कला शाखा ८४.७२ टक्के, वाणिज्य शाखा १०० टक्के तर एम.सी. ही.सी. शाखेचा निकाल ८५.८९ टक्के आहे.*

*महाविद्यालय स्तरावर कला शाखेतून प्रथम अतुल बाबडे ६६.३० टक्के, जयश्री मदनकर ७९.३८ टक्के आणि एम. सी.व्ही.सी. विभागातून इलेक्ट्रीक टेक्नॉलाजीचा विद्यार्थी चेतक ठाकरे याने ८१.३८ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम क्रमाक पटकावला.*

*वाणिज्य शाखेतून प्रथम कोलवास्वामी कला क. महाविद्यालय धापेवाडा येथील एकूण निकाल १०० टक्के असून कु. शितल दाढे या विद्यार्थिनीने ७७ टक्के गुण प्राप्त करुन प्रथम स्थान प्राप्त केले.*

*महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय खापरखेड़ा येथील एकूण निकाल ९५.२० टक्के लागला असून विज्ञान शाखा ९६.५५ टक्के आणि कला शाखा ८९.३६ टक्के असा आहे. या महाविद्यालयात विज्ञान शाखेतून प्रथम कु. निकीता सावसाकडे हिला ८०.६१ टक्के तर कला शाखेतून प्रथम कु.अनु शाहू ८१.५३ टक्के गुण घेऊन प्रथम आली. तर सिल्लेवाडा येथील महाराष्ट्र कला कनिष्ठ महाविद्यालयातून कु. आरती श्रीरामभवन कश्यप ही विद्यार्थीनी ७०.१५ टक्के गुण घेऊन प्रथम आली या महाविद्यालयाचा एकूण निकाल ९६.४२ टक्के आहे. स्व. आनंदरावजी पाटील केदार क. महाविद्यालयाचा विद्यार्थी चेतक ठाकरे यशाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाला,” माझे परिश्रम आणि गुरुजनांचे मार्गदर्शन यामुळेच यश प्राप्त झाले.*

*ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंडता न बाळगता आत्मविश्वासाने अभ्यास करुन आणि सतत गुरुजनांचे मार्गदर्शन घेऊन ध्येयवादी बनावे यशप्राप्ती होतेच. सोबत आईवडिलांचे आशीर्वाद असतातच’ यशस्वी विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय पालक, प्राचार्य, प्राध्यापक शाळा व्यवस्थापन यांना दिले आहे.*

*संस्थाध्यक्ष तसेच कॅबिनेट मंत्री ना. सुनीलभाऊ केदार यांनी यशस्वी विद्यार्थांचे भ्रमणघ्वनीवरुन अभिनंदन केले आणि शिक्षकाचे आभार मानले,*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …