Breaking News

*वाढत्या रुग्णांनी वाढवीले सावनेरकरांचे बीपी* *कठोर उपाययोजना आखून रस्त्यावरील गर्दीवर आळा बसविण्याची मागणी* *बाहेरून येणारे प्रवासी व व्यवसाई,वाढते भाजीपाला फळाचे चे ठेले व सार्वजनिक ठीकाणची गर्दी व नगर प्रशासनाची लचर कार्यप्रणाली केव्हाही धोकादायक ठरु शकते* *नगर प्रशासन ,पुलिस विभागाचे कोवीड़ 19 विषाणूंचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवीण्याकरीता असलेले वाहन व अधिकारी-कर्मचारिही रस्त्यावरून “मिस्टर इंडिया” झाले*

*वाढत्या रुग्णांनी वाढवीले सावनेरकरांचे बीपी*

*कठोर उपाययोजना आखून रस्त्यावरील गर्दीवर आळा बसविण्याची मागणी*

*बाहेरून येणारे प्रवासी व व्यवसाई,वाढते भाजीपाला फळाचे चे ठेले व सार्वजनिक ठीकाणची गर्दी व नगर प्रशासनाची लचर कार्यप्रणाली केव्हाही धोकादायक ठरु शकते*

*नगर प्रशासन , पुलिस विभागाचे कोवीड़ 19 विषाणूंचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवीण्याकरीता असलेले वाहन व अधिकारी-कर्मचारि ही रस्त्यावरून “मिस्टर इंडिया” झाले*


*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः सर्व विदित आहे की दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असुन आता या महामारीचा शिरकाव ग्रामीण भागतही आपली उपस्थिती दर्शवू लागला असुन शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे*

*सावनेर तालुका दि.18 जुलै रोजी एकुण सहा रुग्णांची नोंद त्यात तीन रुग्ण सावनेर शहर तर तीन ग्रामीण भागातील खापरखेडा चनकापुर परीसरात असे एकाच दिवशी सहा रुग्ण मीळाल्याने सावनेरकरांसह तालुक्यातील नागरीकांचे बीपी तर वाढलेच सोबतच स्थानिक व तालुका प्रशासकीय यंत्रणा कोवीड़ 29 च्या उपाययोजनेत कुठेतरी कुजकामी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे*

*निरंतर सर्वेक्षणात नागरिक माहिती देत नाही म्हणून आपले कर्तव्य संपले अथवा स्थानीक प्रशासन,आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन पूर्वीप्रमाणे ऐकोप्याने कार्य करत नसल्याचे अथवा एकमेकांना सहकार्य करत नाही असे म्हटल्याने ही चालनार नाही.तहसील कार्यालय सावनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या मा.जिल्हाधिकारी साहेब व मुख्य कार्यपालन अधिकारी साहेब यांच्या आढावा बैठकीत वरिल मुद्यांवर विशेष चर्चा होऊण सदर मुद्द्यांचे गांभीर्य जाणून तात्काळ उपाययोजना करण्याचे मा.जिल्हाधिकारी साहेबांनी तोंडी आदेश देत सदर कार्यांत कुणालाही व कुणाचीही हयगय केल्या जाणार नसल्याचया विशेष सुचना देऊण चार दिवस लोटल्यावरही पळसाला पानं तीनच अशी स्थीती निर्माण आहे*


*नगर प्रशासन व पोलिस प्रशासनाचे समन्वय नसल्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच चौका चौकात नागरिकांची गर्दी,मोटरसायकल वर तीबल सीट,तोंडावर मास्क नाही,भाजीपाला व फळाचे वाढते हातठेले, नागपूर शहरातून येणारे लाँट व सेल वाले,बाजारातील बीनकामी गर्दी व यागर्दीतील जवळपास निम्यापेक्षा अधिक लोकांच्या तोंडात मास्क नाही,भाजीपाला फळ विक्रेत्याच्या तोंडावर मास्क नाही,दुकानात सेनिटाईझर नाही,दुकानात बसणारे साठी पार केलेले वयोवृद्ध ते दहा वर्षाखालील ची संख्या हे स्थानीक प्रशासनाच्या निदर्शनास न येणे सोबतच नगर प्रशासनाचे कोवीड़ 19 विषाणूंचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवीण्याकरीता असलेले वाहन रस्त्यावरून “मिस्टर इंडिया” झाले आहेयाला जबाबदार कोन…?असा यक्ष प्रश्न नागरिकांतुन होत आहे*

*याऊलट भाजीपाला व फळविक्रेत्यांना रस्त्यावर उभे राहण्याची सख्त मनाई असुन सुध्दा नगर प्रशासनाची चिढ़ काढत मुख्य रस्त्यावर डोलाने गर्दी तर वाढवितातच सोबतच सदर हातठेले नगरिच्या गल्लीबोळात उभी राहल्याने सदर ठेल्यावर दररोज कीती लोकं आले ,कीतींनी त्याला व त्या दुकानदारास संपूर्ण केला अश्यात एखाद्या कोरोना संसर्गजन्य रुग्णाचा स्पर्श त्या हातठेला अथवा दुकानदाराला झाल्यास याची कीती मोठी किंमत मोजावी लागणार याकडे कुणीही प्रशासकीय अधिकारी यांचे कुणाचेही लक्ष का जात नाही मिळात असलेल्या विश्वसनीय माहितीनुसार शहरात 147 फळ व भाजी विक्रेत्यांचा नोंदी असुन जवळपासच्या 500/550 भाजी व फळ विक्रेत्यांची गर्दी कुणाच्या नाकार्तैपणाची देण आहे.*

*वरिल सर्व बाबींवर स्थानिक प्रशासना सोबतच संबंधित सर्व विभागाने योग्य विचार विनिमय उपाययोजना न आखल्यास सावनेर शहर व तालुका जिल्ह्यातील काटोल तालुका सारखे “कोरोना हाँटस्पाँट” बनण्यात वेळ लागणार नाही असे जाणकारांचे मत आहे*


*नगर प्रशासना सह पोलीस प्रशासनाने शहरातील मुख्य चौरस्त,वर्दळीचे ठिकाण,रस्त्यावर होत असलेली गर्दी व लागणारे फळ भाजीचे ठेले सोबतच कोणत्याही प्रकारचे सुरक्षा उपाय नकरता उघड्या तोंडाने फीरणारे,मोटारसायकल वर डबलसीट फीरणारे,गल्लीबोळात हातठेले उभे करुण कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करू पाहणाऱ्यांवर योग्य व दंडात्मक कारवाई तसेच गुन्ह्याची नोंद करण्यात यावे अशी मागणी जनसामान्यांनातुन होत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …