*तहसील, नगरपरिषद, पोलीस स्टेशन, उपजिल्हा रुग्णालय मार्फत रामटेक शहरात कोव्हीड-19 जनजागृती रुटमार्च*

रामटेक तालूका प्रतिनिधी- ललित कनोजे
रामटेक– शहरातील नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. घराबाहेर मास्क शिवाय पडू नये. Social distancing चे पालन करावे. विनाकारण किंवा अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये, नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे निरंतर सर्वेक्षण अत्यंत महत्वाचे असून नागरिकांनी त्याचा उद्देश समजून घेतला पाहिजे व वेळोवेळी ताप/खोकला/सर्दी/श्वसनाचा त्रास बाबत माहिती तात्काळ नगरपरिषद ला देऊन रुग्णालयात तपासणी केली पाहिजे. अश्याने वेळेवर निदान व वेळेवर उपचार होऊन जीव वाचला जातो व त्यामुळे इतरांना होणारा संसर्ग थांबवता येतो”

“जनजीवन के सन्मान मे, कोरोना के विरुद्ध प्रशासन मैदान मे” असा नारा दिला. “मास्क न घातल्यास रु.500/- इतका दंड आकारण्यात येईल. दुकानदारांवर रु.2000/- इतका दंड आकारण्यात येईल., आतापर्यंत जसे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तसेच सहकार्य इथून पुढे नागरिकांनी करावे. असे अाव्हान करण्यात अाले या रूटमार्च चा माध्यमातुन यावेळी रूटमार्च मध्ये तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, मुख्याधिकारी स्वरूप खारगे,पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश उजागरे नगरपरिषद कर्मचारी व पोलीस शिपाई उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज