*गडमंदिर ते जैनमंदिर रोड वाहतुकीस अपघाताला निमंञण*
*चारचाकी वाहन एकाचवेळी क्रास करने धोकादायक*
रामटेक तालूका प्रतिनिधी ललित कनोजे
रामटेक- विकास अाराखडा अंतर्गत गडमंदिर ते बर्वे शाळेपर्यंत एक ते दिड किमी अंतराचा कांक्रीटचे रोड काम पुर्ण वर्षापूर्वी करण्यात अाले . परंतुरोडच्या दोन्ही साईडनी मुरुमाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे एकाच वेळेस चारचाकी वाहन रहदारी करता येतो. जर विरुध्द दिशेने अालेली चारचाकी वाहन समोर जाता येत नाही .त्यामुळे वाहन चालकांना मोठा ञास सहन करावे लागतात व रस्ताचा खाली एक ते दोन फुटाचे साईडिंग मध्ये उतरावे लागते त्यामुळे गाडयाचे मोठे नुकसान होत अाहे. रस्ताच्या साईडिंग मध्ये मुरमाचा भरणा न केल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.
रस्ता तयार करतांनी रस्त्याची उंची जुण्या रस्तापेक्षा दोन फुटांनी वाढ केली व या रस्ता ला असलेली संरक्षण भिंत उंची कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात अाली नाही. जर वाहकांचे नियंञण सुटल्यास वाहन केव्हाही खोल दरीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्तांनी सकाळी व सांयकाळी शहरातील नागरिक फिरायला जातात. त्यानां देखिल या अर्धवट रस्ता मोठया प्रमाणात ञास होत असुन नागरिकांनी या रस्ताचे काम पुर्ण करण्याची मागणी करीत अाहे.
रामटेक विकासा अंतर्गत होणारे अनेक कामे अपूर्ण अाहेत कालीदास स्मारक वराह मंदिरचा खाली दोन स्वच्छतागृह व मृग विहार येथिल याञी निवास कामे अपूर्ण अवस्थेत अाहे.
रामटेक विकासा अंतर्गत 150 कोटी चा प्रस्ताव मंजूर करण्यात अाला होता .भाजप शिवसेना युती सरकार चा काळात त्यांचा पहिला टप्यातील 49 कोटी रुपयाचा निधी कामाकरीता देण्यात अाले होते. त्या निधी मध्ये रामटेक सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभाचे उपविभागीय अंभियता म्हणाले की ठेकेदारांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नाही म्हणून कामे अर्धवट अाहेत ठेकेदारांना 4 कोटी देणे अाहे तसेच 14 कोटीचे प्रस्तावित कामे अाहेत.
अर्धवट कामामध्ये दोन शौचालय मोक्षधाम येथिल काम अंबाळा येथिल ड्रेनेज नाली इतर कामाचा समावेश अाहे. सरकार फेरबदल झाल्याने याचा माञ विकास कामावर परिणाम झाले अाहे.
Maharashtra News Media सच की आवाज