*गृहमंत्री व नागपुर जिल्हाचे पालकमंत्री यांची रेती घाटावर अचानक धाड़*
*तालुक्यातील खापा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कन्हान नदीच्या रेतीघाटांवर मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अचानकपणे पोहचून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री राऊत यांची धडक कारवाई प्रशासकीय अधिकार्यांनाही माहिती न देता मंत्र्यांचे छापे रेती माीयांचे धाबे दनानले*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*नागपूर दी.२१:- गृहमंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी अचानकपणे नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती घाटांवर धाडी टाकल्या. खापा येथील रेती घाटांजवळ माेठ्या प्रमाणावर रेतीचा साठा यावेळी आढळून आला. नागपूर जिल्ह्यात सुरू असलेला अवैध रेतीघाटाचा गाेरखधंदा बंद करण्यासाठी व रेतीमाीयांचे कंबरडे माेडण्यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश यावेळी उच्चअधिकार्यांना दिले.
*गृहमंत्री व पालकमंत्र्यांनी सावनेर, रामटेक, कामठी व उमरेड या विधानसभा मतदारसंघातील पाेलीस स्टेशनला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासाेबत रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल व उमरेडचे आमदार राजू पारवे उपस्थित हाेते. गृहमंत्र्यांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.*
*मागील अनेक दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात रेतीचा अवैधपणे उपसा हाेत असल्याच्या तक्रारी मिळाल्या हाेत्या. या तक्रारीची दखल घेऊन आज गृहमंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी या रेती माीयाचे सांम्राज्य उद्वस्त करण्याच्या इराद्याने आज संयुक्तपणे कुणालाही कुणकुण लागू न देता रेती घाटांवर छापे मारले. रेती घाटावरील अचानक धडक कारवाईमुळे रेतीमाीयांमध्ये घबराट पसरली आहे. अनेक रेती माीयांनी पळ काढल्याचे समजते.यावेळी नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियाेजनबद्ध अवैध रेती उपसाचा प्रकार उघडकीस आला.*
*गृहमंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, नागपूर ग्रामीणचे पाेलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकार्यांची बैठक आयाेजित केली हाेती. यात रेतीमाीयांच्या विराेधात झालेल्या कारवाईची माहिती विचारण्यात आली.*
*राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार मुंबईत असल्याने या कारवाईत सामील हाेऊ शकले नाही अशी माहिती पुढे येत असुन त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदाच थेट राज्याचे गु्हमंत्री,पालकमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फौजफाट एकाच वेळी रेती घाटावर पोहचल्याने सदरहू कारवाई वर अनेक कींतू परंतू व तर्क वितर्क लावले जात आहे.*
*घटनास्थळावरून च अधिकार्यांना घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत यांनी छापे अचानकपणे छापे मारण्याची सूचना केली. नागपुरातून मंत्र्यांचा काफीला थेट सावनेर येथे पाेहाेचला. सावनेर येथील पाेलीस ठाण्याला क्षणीक भेट दिल्यानंतर दाेन्ही मंत्र्यांनी खापा येथील रेती घाटावर धाड मारली. यावेळी खापा येथील नदीच्या काठावर माेठ्या प्रमाणावर रेतीचा साठा असल्याचे दिसून आले. या नदीच्या काठावर व मुख्य प्रवाहात माेठ्या प्रमाणावर खड्डे असल्याचे दिसून आले. रेती माफीयांनी अवैधपणे नदीच्या पात्रात असंख्य पोकलेन मशीनीव्दिरे केलेल्या रेती उपसामुळे झालेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.*
*दाेन्ही मंत्र्यांनी कन्हान येथील रेती घाटावर धाड मारली. यावेळी माेठ्या प्रमाणावर रेतीचा साठा आढळून आला. या रेती चोरांवर वरच्यावर योग्य कठोर कारवाई करण्याकरिता एसडीओ व तहसीलदारांनी धडक कारवाई करावी, अन्यथा या अधिकार्यांचीही गय केली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला. या कारवाईत विभागीय आयुक्त संजयकुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पाेलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, पाेलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, खनिकर्म विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते.*
*रेतीमाफियाव्दारे कन्हान नदिच्या पात्रातून अवैध उत्खनन खपवून घेणार नाही.- अनिल देशमुख*
*गेल्या काही वर्षांपासून रेती तस्करी संरक्षण मिळत असल्याने माेठ्या प्रमाणावर रेतीचा अवैध उपसा हाेत आहे. यामुळे शासनाचे नुकसान हाेत आहे त्याचप्रमाण पर्यावरणाची हानी हाेत आहे. जिल्ह्यातील रेती माफीयांचे मुसके तात्काळ आवरण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत.*
*अधिकार्यांनी कारवाया करण्यासाठी टाळाटाळ केल्यास अथवा रेती चोरट्यांचे लाड पुरवत त्यांना पाठीशी घातल्यास त्यांच्यावरही कठाेर कारवी करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.*
*यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चांगलेच धारेवर धरले.कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा गृहमंत्र्यांनी यावेळी दिला. महसूल पोलीस विभाग व पर्यावरण विभाग यांची संयुक्त समिती तयार करून रेती माफियांवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा यावेळी गृहमंत्री यांनी दिले.*