Breaking News

*राज्याभिषेक सोहळा संपन्न*

*राज्याभिषेक सोहळा संपन्न*

सावनेर ः दि.6 जून रोजी वाघोडा सावनेर येथे WCL मित्र परिवार आणि जनसेवा बहु उद्देशीय संस्था यांच्या वतीने वाघोडा स्थित भगवा चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याची सुरुवात पहाटे 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला वैदिक पद्धतीने अभिषेक करण्यात आला. या प्रसंगी वाघोडा मित्रपरिवारातील आणि जनसेवा बहु उद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. शिवराज्याभिषेक सोहळ्याला माजी जि. प. सदस्या श्रीमती ज्योतीताई शिरस्कर, श्रीमती ग्रा. वा. सरपंच शिप्राताई खेडकर तसेच ग्रा. स. लताताई लांडगे, उपस्थित होत्या. गोतमारे गुरुकुल चे संस्थापक श्री भाऊ गोतमारे सर आणि त्यांचे विद्यार्थी यांनी या सोहळ्यासाठी पहाटेच हजेरी लावली आणि आपले सहकार्य दिले.

सावनेर WCL येथील उप क्षेत्रीय प्रबंधक श्री एम. के. सिंग त्याचप्रमाणे शासकीय औद्योगिक संस्था सावनेर येथील प्राचार्य श्री नांदुरकर सर आणि त्यांचे सहकारी, सावनेर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री किशोरभाऊ धुंडुले, जवाहर विद्यालय वाकोडी के मुख्याध्यापक मदन डहाके, शिवव्याख्याते शैलेश दादा ढबाले, जलतारा अभियान चे श्री भूषणभाऊ कुबडे इत्यादी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करण्यासाठी प्रामुख्याने श्री राकेश भरत सूर्यवंशी, प्रणय बटोले, अस्मित लोखंडे, आर्यन कश्यप, हर्षल बरडे, धीरज प्रसाद, अक्षर कारेमोरे ,तरुण चौहं, तेजस कुरिल ,रोशन घ्यार, भूषण लाड, गौरव बनकर योगेश आचार्य आणि संस्थेच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *