Breaking News

*सोशल मिडियावर दुर्गामातेची अवमानना करण्यार्या वर कठोर कारवाई करा* *ठाणेदार उमेश पाटील यांना निवेदनातून मागणी*

*सोशल मिडियावर दुर्गामातेची अवमानना करण्यार्या वर कठोर कारवाई करा*

*ठाणेदार उमेश पाटील यांना निवेदनातून मागणी*

सावनेर ः संपूर्ण भारतात शरदिय नवरात्रीचे उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात येत असुन अश्याच वेळी समाजात तेढ़ निर्माण करण्याच्या हेतूने कळमेश्वर तालुक्यातील कोहळी या गावातील माथेफिरूने दुर्गामातेवर अपरिहार्य अश्लील लिखाण करत अवमानकारक फोटो प्रसिद्ध केल्याने दुर्गोदेवीच्या भाविकांमध्ये सर्वत्र तिव्र संतापाची लाट आहे*

9
*मिळालेल्या माहितीनुसार संदिप पांडुलीक चंकापुर वय 52 रा.कोहळी तालुका कळमेश्वर याने आपल्या फेसबुकवर आई दुर्गामातेची अवमानना करत अपरिहार्य लिखाण तसेच दुर्गामातेची अश्लील फोटो अपलोड केल्याचा दुर्दैवी प्रकार शरदिय नवरात्र उत्सव सुरु असतांना उघडकीस आल्याने आई जगदंबेचे उपसनेत लिन भाविकांनमधे तिव्र संतांची लाट उसळत असुन सदर माथेफिरू च्या विरोधात कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवून कठोर कारवाई ची मागणी केली असता कळमेश्वर पोलिसांनी माथेफिरू आरोपी संदिप चंकापुर यांच्या विरोधात अप.क्र.848/2025 भारतीय दंड संहिता कलम 299 तसेच माहिती तंत्रज्ञान कलम 66 (ब) नुसार गुन्ह्याची नोंद करुण आरोपीला अटक करुण तपास सुरु केले आहे*
*सदर प्रकरणाचे लोण आता सर्वत्र परसत असुन सावनेर शहरातील युवा समाजसेवी आभिषेक गहरवार, राजेश भारव्दाज, भाऊ गोतमारे, अँड्.मयुरेश देशपांडे,पंकज चरपे, किशोर कुंभारे,हरीश पानपत्ते, राकेश वाघाडे, वेदांत बोबडे, पंकज साबळे आदीसह असंख्य भाविकांनी उमेश पाटील पोलीस निरिक्षक सावनेर,मा. चंद्रशेखर बावनकुळे राजस्व तसेच पालक मंत्री, आमदार आशिष देशमुख, मा.हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण आदिंना लेखी निवेदन सादर करुण हिंदू सनासुदीच्या वेळी सोशल मिडियावर अपरिहार्य मजकुर पोस्ट करून समाजत व्देष निर्माण करु पाहणाऱ्या सदर माथेफिरूवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *