Breaking News

*वेदांत बालक मंदीर च्या चिमुकल्यां द्वारे पर्जन्यवृष्टी यज्ञ*

*वेदांत बालक मंदीर च्या चिमुकल्यां द्वारे पर्जन्यवृष्टी यज्ञ*


*लातूर प्रतिनिधी*

*लातुर च्या सेंट्रल हनुमान भागातील वेदांत बालक मंदीर व पतंजलि योगपीठ परीवार द्वारे पर्जन्य वृष्टी यज्ञ संपन्न. लातुर जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई व दुष्काळ परीस्थीतीवर मात करण्यासाठी “यज्ञात भवती पर्जन्यो” या वेदातील श्लोकाच्या आधारावर पर्जन्य सुक्ताचे मंत्र पठन करण्यात आले*
*चिमुकल्यां मुलामुलींनी यज्ञात आहुती देऊन वरुणराजा ला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली. लातुर चे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांची कन्या कु. शाश्वती हिच्या समवेत सर्व बालगोपालांनी यज्ञ संपन्न केले.*


*सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजलि राज्य प्रभारी विष्णु भुतडा, नारायण भुतडा, सौ. राधीका भुतडा, डॉ. व्यंकटेश सिद्धेश्वरे, राजेंद्र मरळे, ज्ञानेश्वर पाटील, पांडुरंग कचोळ्या, शिवाजी वाघमारे, कल्लप्पा महाजन, किशनराव शिंदे, ज्ञानोबा शिणगीरे, हर्षवर्धन आकनगीरे, सौ. गुडे, पाठक, आळंदकर, हंडे, कुलकर्णी, श्वेता उपासे, किरण दाडगे, विमल रणदिवे, आरती कांबळे, वंदना, कल्पना कांबळे, दत्ता सोनी व पौरोहित्य आचार्य नारायण आर्य यांनी केले. 150 विद्यार्थी व 100 पालकांची उपस्थीती होती*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.सादिरा सबीर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी छे वर्षी …