मराठी चित्रपट “साथ तुझा भेटला” च्या प्रमोशन
*कोराडी प्रतिनिधी-दिलीप येवले*
नागपुर– नवोदित कलाकारांना चित्रपट सृष्टीचे दालन उघडण्यासाठी ची हा चित्रपट नांदी ठरेल_ मराठी चित्रपट “साथ तुझा भेटला” च्या प्रमोशन प्रसंगी डॉ.सिद्धार्थ विनायक काणे कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांचे प्रतिपादन*. सद्याच्या युगातील प्रेमी युगुलांवर आधारित मराठी चित्रपट “साथ तुझा भेटला” हा २७ सप्टेंबर रोजी राज्यभरातील सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अभिनय करणारे बहुतांश कलावंत नागपुरातील आहेत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फाईन आर्टस व इतर विभागाचे विद्यार्थी आहेत, या कलावंतांचा सत्कार,संवाद व चित्रपटाचे प्रमोशन कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेट,व्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश शेराम यांच्या पुढाकाराने शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२९ रोजी सायंकाळी ५ वाजता गुरुनानक हॉल,अंबाझरी रोड नागपूर येथे उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, कुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, मा.डॉ.विनायक देशपांडे,प्र.कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, मा. डॉ.प्रदीप शर्मा,अधिष्ठाता,नागपूर विद्यापीठ, मा. डॉ.उर्मिला डबीर,व्यवस्थापन परिषद सदस्य, मा.विष्णु चांगदे,व्यवस्थापन परिषद सदस्य,मा.दिनेश शेराम,व्यवस्थापन परिषद सदस्य,डॉ.प्रा.शाम कोरेटी,मा.प्रदीप मसराम,उपकुलसचिव,नागपूर विद्यापीठ,डॉ.चेतन मसराम तसेच या चित्रपटाचे नायक चंद्रशेखर बन,सह नायक पूर्वेश बारापात्रे,नायिका प्रणाली राऊत,खलनायक मोहित परतेकी,सहकलाकार मिलिंद शेटे प्रामुख्याने उपस्थित होते. पाहुण्यांच्या सत्कार समारंभ नंतर सर्व कलाकारांचे मा.कुलगुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भाषण करताना नागपूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश शेराम म्हणाले की,पूर्वी चित्रपटात नागपूरचा एखादा कलाकार दिसायचा बाकी सर्व मुंबईचे कलावंत असायचे मात्र “साथ तुझा भेटला” या चित्रपटात जास्त कलाकार नागपूरचे आहेत तर उर्वरित मुंबईचे आहेत व हे सर्व नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.
आपल्या या नव कलाकारांचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहित करणे व त्यांचे सोबत संवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेणे,त्यांच्या चित्रपटा चा प्रचार प्रसार करून शुभेच्छा देणे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे.यानंतर चित्रपटाची नायिका प्रणाली राऊत यांनी सांगितले की,आधुनिक युगात अनेक व्यक्ती व्यस्ततेमुळे तणावग्रस्त जीवन जगत आहेत,अश्या वेळी हा चित्रपट बघितल्यावर प्रेक्षकांचा थकवा दूर होईल. अहंकारावर मात करून प्रेमाचा विजय कसा होतो अश्या प्रकारची ही प्रेमकथा आहे. बेरोजगार तरुण स्वबळावर उभा राहून प्रेयसीची साथ भेटल्यावर त्याचे जीवन कसे पुनरुज्जीवित होते तसेच या प्रवासात त्याला कोणकोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागते हे चित्रपट गृहात जाऊन बघणे एक चांगला अनुभव राहील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कुलगुरू डॉ सिद्धार्थ विनायक काणे म्हणाले की,जीवनात इतर आवश्यक गोष्टी सोबत मनोरंजन सुध्दा आवश्यक आहे.व्यस्त कार्यक्रमातून चित्रपट बघण्याचा छंद मी अजूनही जोपासतो,विरंगुळा सोबत काही मूल्ये चित्रपटातून अनुभवता येते.विदर्भातील विशेषतः नागपूर विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाचे सादरीकरण या चित्रपटाच्या माध्यमातून केले आहे.भविष्यात विदर्भातील नव कलाकारांना चित्रपट सृष्टीत दालन उघडण्यासाठी ही नांदी आहे,या चित्रपटाचे ४० टक्के शूटिंग नागपूर ला झाले हा सुद्धा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,नवी व्यावसायिक ओळख या निमित्याने नागपूरची पाहायला मिळेल,सर्वांनी हा चित्रपट चित्रपट गृहात बघावा व नवोदित कलाकारांना प्रोत्साहन द्यावे माझ्या सर्वांना शुभेच्छा!….या नंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा पर भावना व्यक्त केल्या.कलाकारांनी उपस्थित प्रेक्षक वर्ग यांचे सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या व संवाद साधला.चित्रपटाचे ट्रेलर दाखवून कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली..