ब्रेकिंग न्यूज
*माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाचा अपघात*
*चंद्रपुरहुन नागपुरला जात असताना हा अपघात*
*या अपघातातून अहिर थोडक्यात बचावले, मात्र सीआरपीएफच्या वाहनातील दोघांचा मृत्यू*
*माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीला नागपूर-चंद्रपूर हायवे रोडवर जाम पासून अवघ्या काही किलोमीटर आधी आज सकाळी अपघात झाला असून 3 सुरक्षा जवान गंभीर जखमी झाले आहे. आज सकाळी 7:30 वाजता अहिर हे दिल्ली जाण्याकरिता नागपूर विमातळावर पोहोचण्याकरिता चंद्रपूर निवासस्थानाहून निघाले असताना, जाम च्या काही किलोमीटर आधी त्यांच्या ताफ्यामधील सीआरपीएफ सुरक्षा रक्षकांच्या गाडीला एका अनियंत्रित मालवाहक ट्रकने धडक दिली यामध्ये 3 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र अहिर हे समोरच्या गाडीत असल्याने ते सुखरूप बचावले आहे, अपघात होताच अहिर यांनी तात्काळ गंभीर जखमी सुरक्षारक्षकांना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरण संदर्भात दोघांचा म्रुत्यू झाल्याची माहिती समोर येत असल्याची चर्चा दिसून येत आहे .तर सकाळी 11:10 गंभीर जखमी चालक झाडे व सिआरपीएफ सुरक्षा रक्षक जवान पटेल यांचा ऑरेंज सिटी हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.*
*माजी केन्द्रिय मंत्री यांनी जखमीना दवाखान्यात तात्काळ हलविन्याकरुता अथक परिश्रम केल्याने जखमींना वेळी उपचार मीळाल्याचे बोलले जात आहे*
*अपधात झालेल्या गाडीत चालक विनोद विठ्ठल झाडे 37,रा.चंद्रपूर, सीआरपीएफ जवान फलजीभाई पटेल,एम.जी.साजिद,जयदीपकुमार,प्राकाश भाई,व बनवारीलाल रेगट होते*